हिंगणा तालुक्यातील शिक्षकांकरिता निबंध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:12 AM2021-08-25T04:12:41+5:302021-08-25T04:12:41+5:30
दोन गटांत ही स्पर्धा होईल. ‘अ’ गटातील स्पर्धा वर्ग १ ते ७ पर्यंतच्या शिक्षकांसाठी असेल. ‘ऑनलाइन शिक्षण : दशा ...
दोन गटांत ही स्पर्धा होईल. ‘अ’ गटातील स्पर्धा वर्ग १ ते ७ पर्यंतच्या शिक्षकांसाठी असेल. ‘ऑनलाइन शिक्षण : दशा आणि दिशा ’ या विषयावर या गटाला लेखन करायचे आहे. ‘ब’ गट वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शिक्षकांसाठी असेल. या गटाकरिता ‘ परीक्षाशून्य विद्यार्थी व भविष्यातील स्पर्धात्मक आव्हाने’ हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेतील दोन्ही गटांतील प्रत्येकी ५ विजेत्यांना रोख पुरस्कार, प्रमाणपत्रासह सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी आपले निबंध स्वहस्तलिखित सील बंद लिफाफ्यात त्यावर ठळक अक्षरात स्वतःचे नाव, स्पर्धेच्या गटाचे नाव, स्वतःच्या शाळेचे नाव व दूरध्वनी क्रमांक नमूद करून नेहरू विद्यालय, रायपूर, ता. हिंगणा येथे व्यक्तिशः दिनांक २८ ऑगस्टपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी केले आहे.