गृहिणी समाजातर्फे निबंध लेखन स्पर्धेचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:19+5:302021-02-24T04:07:19+5:30
नागपूर : गृहिणी समाज रामदासपेठच्यावतीने सुमतीसाई सुकळीकर यांच्या स्मृतिनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या ...
नागपूर : गृहिणी समाज रामदासपेठच्यावतीने सुमतीसाई सुकळीकर यांच्या स्मृतिनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत वयोगट १६ ते २५ आणि २५ ते पुढे असे दोन गट होते. फक्त महिलांसाठी आयोजित या स्पर्धेमध्ये दोन्ही गटांमधून एकूण २३ स्पर्धकांनी भाग घेतला.
‘ऑनलाईन शिक्षणपद्धती फायदे आणि तोटे’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर ही स्पर्धा झाली. प्रा. अर्चना मराठे व प्रा. अंजली खरे यांनी परीक्षण केले.पहिल्या गटात पुरस्कार प्रथम मैथली अंजनकर, द्वितीय सोनाली दाभाडे, तृतीय पुरस्कार शिवानी सिडाम गडचिरोली यांना मिळाला. दुसऱ्या गटातून गटातून प्रथम पुरस्कार संध्या लोहकरे, द्वितीय पुरस्कार अस्मिता चावडीपांडे, तृतीय माधुरी कुलकर्णी मेहकर यांना पुरस्कार मिळाले. या कार्यक्रमास गृहिणी समाज रामदासपेठ येथील अध्यक्षा माला सुकळीकर, सचिव वंदना मुजुमदार, संध्या रानडे व मीरा खडक्कार, छाया गाडे, हेमा देशपांडे उपस्थित होते.