लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोर्चात सहभागी होण्यास नकार दिल्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर जातीय अत्याचार करण्यात आला. ही घटना गत वर्षी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्मल नगरीत घडली होती. पोलिसांनी घटनेची त्वरित दखल न घेतल्याने पीडित व्यक्तीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून पोलिसांना नऊ जणांविरुद्ध जातीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा लागला.प्रकरण असे की, पीडित व्यक्ती प्रफुल्ल मनोहर शेंडे हे निर्मल नगरीच्या बिल्डिंग क्रमांक २, फ्लॅट क्रमांक ३ ए मध्ये राहतात.या प्रकरणातील गाळेधारक आरोपींचा बिल्डरसोबत वाद होता. त्यामुळे त्यांनी बिल्डरविरुद्ध मोर्चाचे आयोजन केले होते. आरोपींनी शेंडे यांना मोर्चात सहभागी होण्यास म्हटले होते. परंतु शेंडे यांनी मोर्चात सहभागी होण्यास नकार दिला होता. परिणामी चिडून आरोपींनी ९ ते ११ नोव्हेंबर २०१७ दरम्यान वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली. याशिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे हीन भावनेने संबोधून जातीवाचक शिवीगाळ केली.नंदनवन पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर)(एस)(यू)(व्ही) आणि (झेडसी) कलमान्वये आरोपी अरुण भुरे, दिनेश खंडेलवाल, अजय मालवीय, रमेश बाजीराव, गोपाल शर्मा, अजय गोयंका, प्रकाश भोंगाळे, संजय बुरडे आणि जगदीश डोंगरवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सोनाली वगारे करीत आहेत.
मोर्चात सहभागी न झाल्याने जातीय अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 8:57 PM
मोर्चात सहभागी होण्यास नकार दिल्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर जातीय अत्याचार करण्यात आला. ही घटना गत वर्षी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्मल नगरीत घडली होती. पोलिसांनी घटनेची त्वरित दखल न घेतल्याने पीडित व्यक्तीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून पोलिसांना नऊ जणांविरुद्ध जातीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा लागला.
ठळक मुद्देनागपुरात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल