नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकाम साहित्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 09:47 PM2017-12-09T21:47:45+5:302017-12-09T21:48:19+5:30

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बांधकामात उपयोगी येणाऱ्या मटेरियलच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यावर्षीच्या प्रारंभी ‘ब्यूरो व्हेरिटाज’ नावाने जामठा येथे विश्वस्तरीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आलीअसून आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

Examination of more than 25,000 patterns for the quality inspection of the construction material of the Nagpur Metro Railway | नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकाम साहित्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी

नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकाम साहित्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी

Next
ठळक मुद्देब्युरो व्हेरिटाज या नावाने जामठा येथे क्वॉलिटी कंट्रोल लॅब

आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बांधकामात उपयोगी येणाऱ्या मटेरियलच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यावर्षीच्या प्रारंभी ‘ब्यूरो व्हेरिटाज’ नावाने जामठा येथे विश्वस्तरीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आलीअसून आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
महामेट्रोच नव्हे तर इतर शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांना या प्रयोगशाळेची मदत होत आहे. येथे प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. हा उपक्रम महामेट्रोसाठी आर्थिक स्रोताचे एक उत्तम माध्यम ठरल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतानादिली.
महामेट्रोचे हिंगणा आणि जामठा येथे कास्टिंग यार्ड आहेत. जामठा येथील यार्डमध्ये कॉन्क्रिट, रेती, सिमेंट, टाईल्स आदी सामग्रीची तपासणी अनुभवी आणि तज्ज्ञ चमूकडून करण्यात येते. कास्टिंग यार्डमधील प्रयोगशाळेत सामग्रीच्या नमुन्यांची तपासणी होऊन त्यातील काही नमुने जामठा येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. या ठिकाणी नमुन्याची गुणवत्ता ठरल्यानंतरच बांधकामात त्या सामग्रीचा उपयोग करण्यात येतो. आतापर्यंत ३५ नमुने नामंजूर करण्यात आले असून त्याची प्रमाण ०.१४ टक्के आहे. सिमेंट नमुन्यांची तपासणी तापमान आणि आर्द्रतेचे कृत्रिम वातावरण निर्माण करून केली जाते. चार हजार चौरस फूट जागेत सर्व उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहे.


२४ महिन्यांत ३५०० सेगमेंट तयार होणार
कास्टिंग यार्डमध्ये मुख्यत्वे आय-गर्डर आणि सेगमेंटचे कास्टिंग केले जाते. आतापर्यंत एकूण ११५० सेगमेंट तयार करण्यात आले असून २४ महिन्यांत ३५०० सेगमेंट तयार करण्याचे लक्ष्य आहे. कास्टिंग यार्डमध्ये २४ तास काम करण्यात येत असून ७५० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. येथे सहा आडवे आणि सात उभे कास्टिंग बेड आहेत. यात दिवसाला १५ सेगमेंट आणि ६ आय-गर्डरप्रमाणे २१ युनिट तयार केले जातात. तपासणीनंतर कार्यस्थळावर पाठवून त्याचे लॉन्चिंग करण्यात येते.
कास्टिंग यार्ड २३ एकर क्षेत्रफळजागेत असून आय-गर्डर आणि सेगमेंट २४ ते ३६ तासात हलविले जाते. बांधकामात वापरण्यासाठी २८ दिवसांनी पूर्णपणे तयार होतात. एका सेगमेंटचे अंदाजे वजन ४० टन आणि गर्डरची लांबी ३१ मीटरपर्यंत आहे. निर्मितीत दोष आढळल्यास ते सेगमेंट आणि गर्डरचा दुसरीकडे कुठेही उपयोग होत नाही.
चर्चेदरम्यान महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक अरुण सक्सेना व सुशील कुमार, उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळवे व के.सी. तायडे, मीडिया प्रभारी सुनील तिवारी आणि जनरल कन्सलटंटची चमू उपस्थित होती.

Web Title: Examination of more than 25,000 patterns for the quality inspection of the construction material of the Nagpur Metro Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो