उड्डाण आणि उत्पादन कमी झाल्याचा परिणाम
लोकमत विशेष
वसीम कुरेशी
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्गो परिवहनात कमालीची घट झाली आहे. उड्डाणे कमी झाल्यामुळे, तसेच उत्पादन कमी झाल्यामुळे त्यावर परिणाम पडला आहे, तर कोरोनामुळेही एअर कार्गो कमी झाल्याची स्थिती आहे. वर्षभरापूर्वी नागपूर विमानतळावरून दररोज १०० टन कार्गो बाहेर पाठविण्यात येत होते. आता ५६ टनाच्या जवळपास हा आकडा आला आहे. यामुळे विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल)च्या महसुलावर परिणाम पडला आहे.
लॉकडाऊनच्या पूर्वी नागपूरवरून कतार व एअर अरेबियाची आंतरराष्ट्रीय विमाने सुरू होती, परंतु आता आंतरराष्ट्रीय विमानतळ नावापुरते उरले आहे. कतार एअरवेजने नागपूरवरून विमानसेवा बंद केली. यापूर्वी जेट एअरवेजही बंद झाली आहे. एअर एशियाही नागपूरवरून संचालन करू शकली नाही. एअर इंडियाची सायंकाळची काही विमाने सुरू झाली नाहीत. कोरोनामुळे उत्पादन घटले. आंतरराष्ट्रीय विमानांच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने कार्गोची वाहतूक होत होती. यात एमआयएलला स्क्रिनिंग चार्जशिवाय स्टोरेज चार्जही मिळत होता, परंतु उत्पन्नाच्या हा मार्ग अनेक दिवसांपासून बंद झाला आहे.
............
सध्या कोणाकडे किती कार्गो वाहतूक
विमान कंपनी इनकमिंग कार्गो आउटगोइंग कार्गो
इंडिगो एअरलाइन्स २० टन ५४ टन
गो एअर २ टन १ टन
एअर इंडिया २ १ टन
एकूण २४ टन ५६ टन
राष्ट्रीय कार्गो वस्तू
ऑटो पार्ट
कपडा
एअरक्राफ्ट पार्ट
मेल अँड डॉक्युमेंट
इलेक्ट्रॉनिक वस्तू
आंतरराष्ट्रीय कार्गो वस्तू
फळे
भाजीपाला
औषधी
मशीन
.......