शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:09+5:302021-09-09T04:11:09+5:30

नागपूर : ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असला तरी त्याचा वापर करताना अनेक अडचणी येत आहेत. मोबाईल हाताळणे ...

Fever of 'e-crop' inspection on farmers' heads! | शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

googlenewsNext

नागपूर : ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असला तरी त्याचा वापर करताना अनेक अडचणी येत आहेत. मोबाईल हाताळणे त्यांच्यासाठी अवघड ठरत असल्याने या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे ही योजना चांंगली असली तरी ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.

कोणते पीक कोणत्या रकान्यात भरावे आणि त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच ॲपवर माहिती सबमिट केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ई-पीक पाहणी मोहीम चांगली असली तरी पिकासंदर्भातील माहिती भरणे, सर्व्हर मंदगतीने चालणे, कव्हरेज न मिळणे, यामुळे एका पिकाची माहिती ॲपवर अपलोड करण्यास बराच वेळ खर्च होणे अशा समस्या आहेत. आपण भरलेली माहिती अचूक की चुकीची हे पाहण्यासाठी यात ऑप्शन नाही.

...

हाताळणी कोण शिकविणार? (शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया)

१) शासनाने सुरू केलेली ई-पीक पाहणी आम्हा शेतकऱ्यांसाठी किचकट आहे. आकडेवारी चुकल्यास ती खरी की खोटी हे कळत नाही. यात तशी व्यवस्था नाही.

- विनोद गायकवाड, तुरकमारी, ता. हिंगणा

२) ॲपवर माहिती भरताना अनेक तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत चांगली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणींचा यात विचार झालेला नाही.

दिगांबर बोरकर, फुकेश्वर, ता. उमरेड

...

कोट

ई-पीक पाहणी मोहिमेत पिकासंदर्भातील माहिती ॲपवर कशी भरावी याबाबतची माहिती तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहायक यांच्याकडून प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे. महसूल विभागासोबत ही मोहीम राबविणे सुरू आहे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...

Web Title: Fever of 'e-crop' inspection on farmers' heads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.