सकारात्मक विचार आणि कृतीतून दिला लढा; तुकाराम मुंढे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 08:35 PM2020-09-06T20:35:47+5:302020-09-06T20:39:18+5:30

नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी आपण कोरोनामुक्त झाल्याचा संदेश  ट्विट करून दिला आहे. त्यात त्यांनी, आपण सकारात्मक विचार आणि कृतीतून कोरोनाशी लढा दिल्याचे म्हटले आहे.

Fight given through positive thinking and action; Tukaram Mundhe Corona free | सकारात्मक विचार आणि कृतीतून दिला लढा; तुकाराम मुंढे कोरोनामुक्त

सकारात्मक विचार आणि कृतीतून दिला लढा; तुकाराम मुंढे कोरोनामुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी आपण कोरोनामुक्त झाल्याचा संदेश  ट्विट करून दिला आहे. त्यात त्यांनी, आपण सकारात्मक विचार आणि कृतीतून कोरोनाशी लढा दिल्याचे म्हटले आहे.
त्याचसोबत स्ट्रॉंग विलपॉवर, नेमके व संयुक्त प्रयत्नांचीही त्याला जोड आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नागपुरात तुकाराम मुंढे यांनी कोरोना रोखण्याच्या संदर्भात अनेक कठोर व तातडीने निर्णय घेतले होते. त्यांनी दररोज शहराची पाहणी करत नियोजनपूर्वक धोरणे राबविली होती. त्यांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांनी गृह विलगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्या दरम्यान त्यांची मुंबईला बदली झाली होती.

तुकाराम मुंढे यांची पोस्ट 

प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी आज कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

नागपूर महानगरपालिकेच्या सात महिन्यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळातील साडे पाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. २४ ऑगस्ट रोजी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरू झाला. चाचणीचा निकाल आला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले. समाजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठीसुद्धा या गोष्टी आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली दांडगी इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि ध्येयनिश्चितीच्या जोरावर समाजात सकारात्मकता पसरवावी, हीच सदिच्छा...!

चला, समाजात सकारात्मकता रुजविण्यासाठी समविचारी आणि प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊया..!

जय हिंद.. !

 

Web Title: Fight given through positive thinking and action; Tukaram Mundhe Corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.