- खासगी रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:59+5:302021-04-15T04:06:59+5:30
आरोपी जमीर खान जुहूर खान (२५) रा. जुना मानकापूर याने मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शगुफ्ता अंजुम खान (३४) ...
आरोपी जमीर खान जुहूर खान (२५) रा. जुना मानकापूर याने मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शगुफ्ता अंजुम खान (३४) यांना उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पण आरोपी जमीर खान व अमीर खान नूर खान (२७) यांनी मृताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी घेऊन जायचे असल्याचे सांगून, ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्यांना नकार दिला. त्यामुळे आरोपींनी नातेवाईकांना बोलावून रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालयात तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान केले. फिर्यादी डॉ. तुषार धवड व स्टाफला मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला.
- अल्पवयीन मुलींचा विनयभंग
नागपूर : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक करून पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पायी घरी जात होती. वस्तीतील आरोपी अखिलेश मनोज शेंडे (२१) याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. मुलीने यासंदर्भात कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली.