विधी विद्यापीठाची पहिली बॅच उद्यापासून
By admin | Published: July 31, 2016 02:50 AM2016-07-31T02:50:59+5:302016-07-31T02:50:59+5:30
राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पहिल्या शैक्षणिक सत्राला येत्या १ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे.
‘ज्योती’ इमारतीत होणार वर्ग : आवश्यक सुविधा पूर्ण
नागपूर : राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पहिल्या शैक्षणिक सत्राला येत्या १ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. यासाठी आवश्यक सोयी सुविधा पूर्ण झाल्या आहेत.
सिव्हील लाईन्स येथील ‘ज्योती’च्या (ज्युडिशिअल आॅफिसर्स टेनिंग अॅकेडमी) इमारतीत याचे वर्ग सुरू होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉ. विजेंदर कुमार हे कुलगुरू आहेत. विद्यापीठातील सर्व सुविधा, अभ्यासक्रम, विद्यार्थी संख्या, विविध शाखा, प्राध्यापक वर्ग आणि इतर गोष्टी या नियमाप्रमाणे असाव्यात अशी अपेक्षा होती. यासाठी न्यायमूर्ती बोबडे यांच्या निर्देशानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तत्पूर्वी शासनाने ४२ पदांना मान्यता प्रदान केलेली आहे. यात कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह दोन प्राध्यापक व सहा सहायक प्राध्यापक पदांचा समावेश आहे. उपकुलसचिव, ग्रंथपाल, प्रशासकीय अधिकारी अशा ३३ पदांचा शिक्षकेतर पदांमध्ये समावेश आहे . एकूण ६० जागा आहेत. (प्रतिनिधी)