लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील बेवारस श्वानाबाबतच्या तक्रारी विचारात घेता व श्वानांच्या चावा घेण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात बुधवारी सुरू केला. पहिल्याच दिवशी १५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील श्वानांचा समावेश आहे.बेवारस श्वानांवर नसबंदी करण्याची जबाबदारी वेस्ट फॉर अॅनिमल्स रिकगनाईज बाय अॅनिमल या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. पहिल्या दिवशी १५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. परंतु ही संख्या ५० पर्यत वाढविली जाणार आहे. तसेच १५ दिवसात दुसरे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणच्या बेवारस श्वानांवर नसबंदी केली जाणार आहे. यात रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक, विमानतळ व बाजार भागातील श्वानांचा समावेश राहणार आहे. पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमातही मोकाट डुकरे व कुत्र्यांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. मोकाट कुत्री व डुकरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यानुसार कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.डुकरे पकडण्याचे कंत्राटबेवारस श्वानांप्रमाणे शहरात डुकरांचाही त्रास आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहे. परंतु यातून लवकरच नागरिकांची सुटका होण्याची आशा आहे. महापालिकेने लक्ष्मीनगर व धरमपेठ परिसरातील बेवारस डु करे पकडण्याचे कंत्राट दिले आहे. कंत्राटदार लवकरच डुकरे पकडण्याला सुरुवात करणार आहे. शहरातील सर्वच झोनमधील डुकरे पकडली जाणार असल्याची माहिती गजेंद्र महल्ले यांनी दिली.
नागपुरात पहिल्याच दिवशी १५ श्वानांवर नसबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:17 PM
शहरातील बेवारस श्वानाबाबतच्या तक्रारी विचारात घेता व श्वानांच्या चावा घेण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात बुधवारी सुरू केला. पहिल्याच दिवशी १५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील श्वानांचा समावेश आहे.
ठळक मुद्देमनपाचा उपक्रम : रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश