राज्यातील पहिला फ्लोटिंग सोलर प्लांट चंद्रपुरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 08:00 AM2022-10-22T08:00:00+5:302022-10-22T08:00:02+5:30

Nagpur News महाराष्ट्रातील पहिला मोठा फ्लोटिंग सोलर प्लांट चंद्रपुरातील इरई धरणावर साकारण्यात येणार आहे. महाजेनकोने यासाठी १०५ मेगावॅट प्लांट क्षमतेची निविदा निश्चित केली आहे.

First Floating Solar Plant in the State at Chandrapur | राज्यातील पहिला फ्लोटिंग सोलर प्लांट चंद्रपुरात 

राज्यातील पहिला फ्लोटिंग सोलर प्लांट चंद्रपुरात 

googlenewsNext
ठळक मुद्देइरई धरणावर १०५ मेगावॅट सोलर फ्लोटिंग प्लांट

आशीष राॅय

नागपूर : महाराष्ट्रातील पहिला मोठा फ्लोटिंग सोलर प्लांट चंद्रपुरातील इरई धरणावर साकारण्यात येणार आहे. महाजेनकोने यासाठी १०५ मेगावॅट प्लांट क्षमतेची निविदा निश्चित केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सतलज जल विद्युत मंडळ (एसजीव्हीएन)ला ५१४ कोटी रुपयात हे काम वितरित करण्यात आले आहे.

या पूर्ण प्रकल्पाचा खर्च ८५० कोटी रुपये इतका आहे. एसजीव्हीएन यासाठी वीज वहन यंत्रणा सुद्धा तयार करेल. नवी मुंबई मनपा सुद्धा १०० मेगावॅट क्षमतेचा सोलर प्लांट उभारणार आहे. परंतु आतापर्यंत याची निविदा निश्चित झालेली नाही, इरई धरणावरील सोलर प्लांटचे कार्य १५ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. यासाठी महाजेनको बोर्ड यावर विचार करून मंजूर प्रदान करेल. हा प्रकल्प महावितरण व महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मंजुरीवर अवलंबून राहील. निविदा अटीनुसार एसजीव्हीएनला येथे तयार होणारी वीज ३.९४ रुपये प्रति युनिटच्या दरावर विकावी लागेल.

दुहेरी फायदे

महाजेनकोतर्फे सांगण्यात आले आहे की, या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी निविदा भरली होती. एसजीव्हीएन ग्रीन एनर्जीसह ‘आवाडा’सुद्धा सहभागी होती. यासाठी ई-रिव्हर्स बोली १९ ऑक्टोबर २०२२ रोजी झाली. एसजीव्हीएनने तेव्हा ४.१० रुपये प्रति युनिट व आवाडाने ४.३५ रुपयाची दर ठेवली होती. नंतर एसजीव्हीएनने यात सुधारणा करीत ३.९३ रुपये दर केली. हा प्रकल्प जलस्रोताच्या २०० हेक्टर परिसरात साकार होईल. या प्रकल्पाचे दोन लाभ आहेत. पहिली गोष्ट तर यासाठी जागेची गरज पडणार नाही. हाच प्रकल्प जमिनीवर असता तर जवळपास ४२० एकर जागा लागली असती. दुसरा फायदा म्हणजे जलस्रोताचे बाष्पीकरण नुकसान कमी होईल.

Web Title: First Floating Solar Plant in the State at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.