लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासन तत्परतने कामाला लागले आहे. या मार्गाच्या कामात अडथळा असलेली दुकाने, इमारती तोडण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात महापालिका आपल्या स्वत: च्या मालकीच्या व शासकीय इमारती तोडणार आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात करण्यात आली. बडकस चौक येथील पार्किंगची जागा व महापालिका सहकारी बँकेची संरक्षण भिंत तोडण्यात आली.मंगळवारी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर प्रवीण दटके, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाºयांनी १.७० कि.मी. लांबीच्या केळीबाग मार्गाची पाहणी केली. हा मार्गा २४ मीटर रुंद करण्याच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. १.७० कि.मी. लांबीच्या या मार्गावर १५७ दुकाने व इमारती बाधित होतात. या मार्गालगतच्या नझुलच्या जमिनीवर १७० दुकाने आहेत. तहसीलदारांना बाधितांची यादी सोपविण्यात आली आहे.महापालिका सर्वप्रथम आपल्या स्वत:च्या मालकीच्या जागेवरील बांधकाम तोडणार आहे. यात महापालिकेच्या गांधीबाग झोन कार्यालयाच्या इमारतीचा मोठा भाग तोडला जाणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुगदल यांनी ‘लोकमत’ला दिली. सहकारी बँक व पार्किंगच्या जागेवरील बांधकाम हटविण्यात आले. अतिक्रमण हटविण्याची व तोडण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे तसेच मार्गाच्या पुनर्निर्माण प्रस्तावाचे कामही सुरू राहणार आहे. सिमेंट रोडच्या तिसऱ्या टप्प्यात या मार्गाचे काम केले जाणार आहे. आयुक्तांनी बाधित होणाऱ्या दुकानदारांशी व स्थानिक नागरिकांसोबत पाहणी दौऱ्यादरम्यान चर्चा के ली.अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती आयुक्तांनी घेतली. अधिकाऱ्यांसोबतच प्रवीण दटके यांनीही बाधित होणाऱ्या इमारतींची माहिती दिली. मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम, एसएनडीएल, ओसीडब्ल्यू यांच्यासह अन्य विभागात समन्वय ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी गांधीबाग झोनच्या सभापती वंदना यंगटवार, नगरसेवक राजेश घोडपागे, सहायक आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थित होते.महाल बाजाराचे अस्तित्व संपणारबडकस चौक ते महाल टाऊ न हॉल दरम्यानच्या मार्गावरील बाजारामुळे या भागात कायम वर्दळ असते. परंतु केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणासोबतच बाजाराचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. रुंदीकरणात बाजारातील बहुसंख्य दुकाने तुटणार आहेत.बाधितांना मिळणार मोबदलाकेळीबाग मार्गाच्या रुंदीकरणात ज्या लोकांची दुकाने वा घरे जाणार आहेत, त्यांना मोबदला दिला जाणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. मोबदल्याचे स्वरूप अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. याबाबत अर्ज प्राप्त झाल्यानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे.आठवडाभरात दस्ताऐवज सादर करामहापालिके ने केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणामुळे बाधित होणारे दुकानदार, इमारत मालकांना आठवडाभरात जागा मालकी हक्काबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहे. बाधितांना महापालिकेतर्फे पत्र पाठविण्यात आलेली आहेत. महाल झोन कार्यालयात दस्ताऐवज स्वीकारले जाणार आहे.