मेट्रो रेल्वे : सीताबर्डी ते लोकमान्यनगर मार्गलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी ते लोकमान्यनगर (रिच-३) मार्गावरील प्रकल्पाचे कार्य वेगात सुरू आहे. सुभाषनगर मेट्रो स्टेशनजवळ बनलेल्या दोन पिलरमध्ये पहिल्या सेगमेंटचे यशस्वीरीत्या लॉन्चिंग करण्यात आले. मेट्रोच्या रिच-३ च्या कामाची सुरुवात सहा महिन्यांपूर्वी झाली, हे उल्लेखनीय.याप्रसंगी महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (वित्त) शिवमाथन, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-३) अरुण कुमार, प्रकल्प संचालक (जनरल कन्सलटंट) मोहम्मद झझाऊ उपस्थित होते. सेगमेंट लॉन्चिंग बघण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सेगमेंटचे अंदाजे वजन ४० टन आहे. त्याला उचलण्याकरिता २२० टन क्षमतेची क्रेन लावण्यात आली होती. दोन पिलरमधील अंतर ३१ मीटर आहे. यामध्ये नऊ मीटर लांबीचे तीन आणि दोन मीटर लांबीचे दोन सेगमेंट दोन पिलरमध्ये बसविण्यात येणार आहे. नागरिक आणि वाहतुकीला त्रास होऊ नये म्हणून सेगमेंटचे लॉन्चिंग मध्यरात्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धारित वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मेट्रो रेल्वेची चमू एकजुटीने काम करीत आहे. रिच-३ मध्ये सुरू असलेल्या पहिल्या महिन्याच्या कार्यादरम्यान सेगमेंटचे लॉन्चिंग ही प्रकल्पाकरिता मोठी उपलब्धी आहे.
पहिल्या सेगमेंटचे लॉन्चिंग
By admin | Published: May 25, 2017 1:47 AM