गोळीबारात मच्छिमाराचा मृत्यू

By admin | Published: September 22, 2015 01:56 AM2015-09-22T01:56:51+5:302015-09-22T01:56:51+5:30

पाकिस्तानी जहाजावरील व्यक्तीने केलेल्या गोळीबारात अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या गुजरातमधील नौकेतील एका मच्छिमाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

Fisherman's death in firing | गोळीबारात मच्छिमाराचा मृत्यू

गोळीबारात मच्छिमाराचा मृत्यू

Next

मुंबई : पाकिस्तानी जहाजावरील व्यक्तीने केलेल्या गोळीबारात अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या गुजरातमधील नौकेतील एका मच्छिमाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. इक्बाल अब्दुल भट्टी असे मृत तरुणाचे नाव आहे.
गुजरात राज्यातील ओखा परिसरातून मच्छिमारीचा व्यवसाय करणारी प्रेमराज नावाची नौका नेहमीप्रमाणे शुक्रवारी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी गेली होती. रात्रीच्या वेळी नौका १८० नॉटीकल मैल खोल समुद्रात पोहचताच पाकिस्तानी झेंडा लावलेल्या जहाजातून आलेल्या तरुणांनी सात गोळ्या या बोटीच्या दिशेने झाडल्या. यामध्ये भट्टीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुजरातच्या ओखा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्या आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन गुन्हा २०० नॉटिकल मैलच्या आत घडल्याने पुढील तपासासाठी येलोगेट पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

Web Title: Fisherman's death in firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.