मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित; नागपूर मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 08:55 PM2022-09-22T20:55:58+5:302022-09-22T20:57:26+5:30

Nagpur News मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई न करणे, कार्यालयात उपस्थित नसणे व कामात हलगर्जीपणा करीत असल्याच्या कारणावरून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी नेहरूनगर झोनच्या कर विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

Five employees of property tax department suspended; Nagpur municipal commissioner on action mode | मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित; नागपूर मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर

मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित; नागपूर मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर

Next
ठळक मुद्देकर वसुलीत हलगर्जीपणा केल्याने कारवाई

नागपूर : मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई न करणे, कार्यालयात उपस्थित नसणे व कामात हलगर्जीपणा करीत असल्याच्या कारणावरून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी नेहरूनगर झोनच्या कर विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

नामांतरण संबंधित अर्ज वेळेवर निकाली न काढल्यामुळे जवाहर धोंगडे, स्वप्नील पाटील, हेमंत चामट यांना थेट निलंबित करण्यात आले. तर विनापरवानगी गैरहजर असल्याने राजस्व निरीक्षक अशोक गिरी व कर संग्राहक अमित दामणकर या दोघांना निलंबित करण्यात आले.

बुधवारी आयुक्तांनी नेहरूनगर झोनला नेहरूनगर झोन कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम व सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते. सेवा पंधरवडा अंतर्गत मालमत्ता कर विभागाच्या सेवा नागरिकांना वेळेवर उपलब्ध करणे आवश्यक आहे. सदर कामात या झोनचे पाच कर्मचारी दिरंगाई करताना निर्दशनास आल्याने आयुक्तांनी पाच कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई केली.

नेहरूनगर झोनमधील २१ हजार मालमत्ताधारकांकडे १५.९२ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीकरिता स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई न केल्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

सहायक आयुक्तांना नोटीस

कर विभागाकडून होत असलेल्या कामचुकारपण बद्दल नेहरुनगर झोनच्या कर विभागाच्या सहायक अधीक्षक अनिल महाजन यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करा

मालमत्तेचे नामांतरण, कर निर्धारण संदर्भातले प्रलंबित कामे ४८ तासांच्या आत करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. २१ हजार मालमत्ता धारकांकडील १५.९२ कोटीची थकीत कर वसुल करण्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Five employees of property tax department suspended; Nagpur municipal commissioner on action mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.