......
तहसील कार्यालय भिवापूर
भिवापूर : शहर व तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भिवापूर न्यायालय येथे न्या. त्रिवेणी वाकडीकर, पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार महेश भोरटेकर, पंचायत समिती येथे सभापती ममता शेंडे, तालुका कृषी विभाग येथे तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती विठ्ठल राऊत यांच्या हस्ते, खरेदी विक्री संस्था येथे सभापती चरणजितसिंग अरोरा, नगर पंचायत येथे मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, भिवापूर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जोबी जॉर्ज, विद्यानिकेतन स्कूल येथे मुख्याध्यापिका ज्योती लांबट, राष्ट्रीय विद्यालय येथे मुख्याध्यापक इमरान शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्थानिक बुद्धविहार येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहीद मंगेश हरिदास रामटेके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी हरिदास रामटेके, दिनेश रामटेके, पिंटू श्रीरामे, शुभम गुटखे उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. वसंत खवास, एकनाथ वराडे, पुणेश्वर मोटघरे, प्रशांत गायकवाड, बलवंत जांभुळकर, श्रीकृष्ण खोब्रागडे, सुहास पाटील, राजकुमार उके, सूरज बोरकर, अतुल जनबंधू, आदी उपस्थित होते. वीरखंडी धापर्ला येथे सरपंच सचिन ठवकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व इतर साहित्याचे वितरण करण्यात आले.