वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातून हज यात्रेसाठी मुंबई आणि दिल्ली येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमाने पाठविण्यात येत आहेत. ही विमाने नागपुरात प्रवासीविना येऊ नये, याकरिता एअर इंडियाने त्यांना शेड्यूल फ्लाईट म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डयण महासंचालनालयाने या अतिरिक्त उड्डाणाला मंजुरी दिली आहे.मुंबई व दिल्ली येथून नागपुरात येणाऱ्या विमानाचे भाडे राजस्थानी एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लासच्या भाड्याएवढे राहील. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईहून एअर इंडियाच्या विमानाने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी किफायत शुल्काची संधी आहे. ही उड्डाणे १८० सीटांच्या एअरबस-३२० नियो विमानाने होणार आहेत. दिल्ली ते नागपूरचे भाडे २०२२ रुपयांपासून तर मुंबईचे भाडे २५९८ रुपयांपासून आहे. यामध्ये आठ विमाने मुंबई-नागपूर आणि एक दिल्ली-नागपूर राहणार आहे.सप्टेंबरमध्ये हज यात्रेकरूंच्या परतीदरम्यान नागपूर ते मुंबई व दिल्लीकरिता किफायत दरात उड्डाणे उपलब्ध राहतील. २ सप्टेंबरपासून अशी १३ उड्डाणे राहणार आहेत. हज यात्रेकरू नागपुरात परत आल्यानंतर घरगुती उड्डाणाच्या स्वरूपात चालणाºया या किफायत उड्डाणांमध्ये उपलब्ध अतिरिक्त विमानांच्या तुलनेत जास्त प्रवासी जाण्याची अपेक्षा आहे.
अशी आहेत उड्डाणे तारीख वेळमुंबई-नागपूर २६ जुलै स. ८.५० वा.मुंबई-नागपूर २६ जुलै स ११.५५ वा.मुंबई-नागपूर २७ जुलै स. ८.५० वा.मुंबई-नागपूर २७ जुलै स. ११.३० वा.मुंबई-नागपूर २८ जुलै स. ८.५० वा.मुंबई-नागपूर २८ जुलै स. ११.५० वा.दिल्ली-नागपूर २८ जुलै स. ६.१० वा.मुंबई-नागपूर २९ जुलै स. ६.१० वा.मुंबई-नागपूर २९ जुलै स. ११.३० वा.