कन्हान नदीत रस्ता करून पाण्याचा प्रवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:25 PM2019-05-15T22:25:34+5:302019-05-15T22:28:48+5:30

नवेगाव खैरी येथून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडले जाते. हा कालवा नदीला लागून आहे. तामसवाडी गावाजवळ कन्हान नदीच्या प्रवाहात वेकोलीच्या कंत्राटदाराने ट्रक वाहतुकीसाठी ३० फूट रुंदीचा रस्ता तयार केला. यामुळे नदीचा प्रवाह बाधित झाला. याचा कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपातळीवर परिणाम झाल्याने शहरातील उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरातील काही भागातील पाणीपुवठ्यावर परिणाम झाला .

The flow of water through the Kanhan river is blocked | कन्हान नदीत रस्ता करून पाण्याचा प्रवाह रोखला

कन्हान नदीत रस्ता करून पाण्याचा प्रवाह रोखला

googlenewsNext
ठळक मुद्देवेकोलीच्या कंत्राटदाराची करामातजलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवाहात अडथळामनपाने प्रवाह मोकळा केला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवेगाव खैरी येथून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडले जाते. हा कालवा नदीला लागून आहे. तामसवाडी गावाजवळ कन्हान नदीच्या प्रवाहात वेकोलीच्या कंत्राटदाराने ट्रक वाहतुकीसाठी ३० फूट रुंदीचा रस्ता तयार केला. यामुळे नदीचा प्रवाह बाधित झाला. याचा कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपातळीवर परिणाम झाल्याने शहरातील उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरातील काही भागातील पाणीपुवठ्यावर परिणाम झाला .
सिंचन विभागाने नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान जलशुद्धीकरण केद्रासाठी कन्हान नदीच्या प्रवाहात ७५क्यूसेक्स पाणी सोडले होते. ३२ किलोमीटर अंतर पार करून हे पाणी कन्हान जलशुद्धकरण केंद्राच्या इन्टेकवेलमध्ये पोहचणे अपेक्षित होते. परंतु इन्टेकवेलच्या पाण्याची पातळी वाढली नाही. याचा विचार करता महापालिकेच्या जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्तपणे कन्हान नदी परिसराची पाहणी केली. यात तामसवाडी गावाजवळ कन्हान नदीचा प्रवाह बाधित करून वेकोलीच्या कंत्राटदाराने रस्ता निर्माण केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रवाह थांबला होता. संबंधित कंत्राटदाराने सिल्लेवाडा खाणीत रेती पुरवठ्याचे कंत्राट घेतले आहे. केद्रात पाणी न पोहचल्याने महापालिका प्रशासन सक्रिय झाले होते.
तामसवाडी येथील सिंचन विभागाचे कार्यालय एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे रस्ता निर्माण केला आहे. जलप्रदाय विभागाने सिंचन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला रेती उत्खननाची माहिती देण्यात आली. जलप्रदाय विभागाला अवैध रस्ता निर्माण केल्याची माहिती नव्हती.
महापालिकेचे अपर आयुक्त राम जोशी यांनी या प्रकरणात वेकोलीचे सहायक महाव्यवस्थापक डी.एम.गोखले यांच्याशी चर्चा केली. तात्काळ रस्ता हटविण्याचे निर्देश देण्यात आले. रेती उत्खननाचा कंत्राटदाराकडे परवाना असल्याचा दावा वेकोलीने केला आहे. तामसवाडी येथे कन्हान नदीत कच्चा रस्ता दोन दिवसाआधी बांधण्यात आला होता. हा रस्ता हटविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली. यामुळे नदीप्रवाह बाधित होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The flow of water through the Kanhan river is blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.