स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसोबत करार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 08:20 PM2020-02-16T20:20:57+5:302020-02-16T21:41:05+5:30

सेंट्रल एशियन फ्लायवेमधील पक्षांच्या स्थलांतरित मार्गासाठी महाराष्ट्रातील पाणथळ जमीन महत्त्वपूर्ण मानली जाते. 

Forest department contracts with Bombay Natural History Society for conservation of migratory subterranean birds | स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसोबत करार

स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसोबत करार

Next

नागपूर : स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या वनविभागाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सोबत एक सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र वन विभाग 2 कोटी 77 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे.

महाराष्ट्रात पक्षी शास्त्रीयदृष्ट्या अनेक महत्वाची पाणथळ आहेत. पक्षी त्यांच्या प्रजनन क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी विशिष्ट हवाई मार्गाचा वापर करतात. जगातील नऊ विशिष्ट सेंट्रल एशियन फ्लायवेचा वापर यासाठी केला जातो. त्यामध्ये 182 प्रजातींमधील 279 पक्ष्यांचे आश्रयस्थान महाराष्ट्रात आहे. सेंट्रल एशियन फ्लायवेमधील पक्षांच्या स्थलांतरित मार्गासाठी महाराष्ट्रातील पाणथळ जमीन महत्त्वपूर्ण मानली जाते. 

राज्यात जायकवाडी पक्षी अभयारण्य, गंगापूर धरण आणि नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य तसेच माहुल सेवरी दलदल, ठाणे खाडी उरण आणि अलिबाग यांचा समावेश असलेल्या स्थळांच्या समूह सेंट्रल एशियन फ्लायवे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण स्थळ म्हणून ओळखले जाते.

Bombay Natural History Society International Conference on Migratory Birds | पाणथळ जागा, स्थलांतरित पाणपक्ष्यांवर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची आंतरराष्ट्रीय परिषद

आणखी बातम्या...

अयोध्येत नक्की जा म्हणजे तुमचे हिंदुत्वाचे खरे रक्त जागे होईल, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे

भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या

आर. आर. आबांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार

Web Title: Forest department contracts with Bombay Natural History Society for conservation of migratory subterranean birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.