नागपूर : स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या वनविभागाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सोबत एक सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र वन विभाग 2 कोटी 77 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे.
महाराष्ट्रात पक्षी शास्त्रीयदृष्ट्या अनेक महत्वाची पाणथळ आहेत. पक्षी त्यांच्या प्रजनन क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी विशिष्ट हवाई मार्गाचा वापर करतात. जगातील नऊ विशिष्ट सेंट्रल एशियन फ्लायवेचा वापर यासाठी केला जातो. त्यामध्ये 182 प्रजातींमधील 279 पक्ष्यांचे आश्रयस्थान महाराष्ट्रात आहे. सेंट्रल एशियन फ्लायवेमधील पक्षांच्या स्थलांतरित मार्गासाठी महाराष्ट्रातील पाणथळ जमीन महत्त्वपूर्ण मानली जाते.
राज्यात जायकवाडी पक्षी अभयारण्य, गंगापूर धरण आणि नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य तसेच माहुल सेवरी दलदल, ठाणे खाडी उरण आणि अलिबाग यांचा समावेश असलेल्या स्थळांच्या समूह सेंट्रल एशियन फ्लायवे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण स्थळ म्हणून ओळखले जाते.
आणखी बातम्या...
'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे
भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या