लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य पोलिस दलातील एसीपी आणि डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून नागपूरला चार नवे डीसीपी (उपायुक्त) आणि सहा एसीपी (सहायक आयुक्त) मिळणार आहेत. नागरी हक्क संरक्षण आणि पोलीस प्रशिक्षण विद्यालयालाही नवीन अधीक्षक दर्जाचे अधिकारी मिळणार आहेत.येथील पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांची बदली नागपूर ग्रामीणमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. तर ईओडब्ल्यूच्या उपायुक्त श्वेता खेडकर या महामार्ग सुरक्षा पोलिस दलाच्या अधीक्षक म्हणून आता जबाबदारी सांभाळणार आहेत.नागपूर ग्रामीणमधील नूरउल हसन, जालन्याहून अक्षय शिंदे, अमरावतीहून लोहित मतानी आणि बुलडाण्याचे संदीप पखाले या चार अधिकाऱ्यांची पोलीस उपायुक्त म्हणून नागपुरात बदली झाली आहे. त्याचप्रमाणे पुण्याहून दीपक साकोरे यांची नागरी हक्क संरक्षणाचे पोलीस अधीक्षक म्हणून नागपुरात बदली झाली आहे. येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयाचे उपअधीक्षक म्हणून श्रीकांत डीसले बीडहून नागपुरात येणार आहेत.गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव पुण्याला बदलून गेले आहेत. त्या बदल्यातशहर पोलीस दलात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात सहायक पोलिस आयुक्तांची पदे भरली जाणार आहेत. त्यात पालघरचे विकास नाईक, इचलकरंजीचे गणेश बिराजदार, मांडगाव (रायगड)चे शशिकिरण काशिद, मलकापूर, बुलडाण्याच्या प्रिया ढाकणे, देऊळगाव राजा येथून भीमराव नलावडे आणि कराडहून सुरज गुरव हे अधिकारी नागपूर शहरात सहायक पोलिस आयुक्त म्हणून बदलून येत आहेत.शहर पोलीस दलात परिमंडळ ४ चे उपायुक्त, पोलीस मुख्यालय आणि विशेष शाखा ही उपायुक्तांची तीन पदे रिक्त होती. बुधवारच्या बदलीच्या यादीनुसार दोन उपायुक्त नागपूर येथून बाहेर केले तर चार अधिकारी येथे येणार आहेत. त्यामुळे उपयुक्तांचे एक पद रिक्त राहणार आहे. त्यामुळे एखाद्या सहायक पोलीस आयुक्ताला उपायुक्तांचा तात्पुरता प्रभार दिला जाऊ शकतो.
नागपूर शहर पोलीस दलात चार नवीन डीसीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:44 PM
राज्य पोलिस दलातील एसीपी आणि डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून नागपूरला चार नवे डीसीपी (उपायुक्त) आणि सहा एसीपी (सहायक आयुक्त) मिळणार आहेत.
ठळक मुद्देसहा एसीपीही येणार : श्वेता खेडकर सांभाळणार राज्य महामार्ग