खापरखेडा : ग्रामीण भागात दुचाकी चाेरीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनमालक हैराण झाले आहेत. खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाकबंगला) येथून माेटरसायकल चाेरीला गेली. त्यामुळे वाहन चाेरट्यांना वेळीच आवर घाला, अशी मागणीही केली जात आहे.
नीलेश बाबूराव लाेखंडे (३१, रा. पिपळा डाकबंगला, ता. सावनेर) याने शनिवारी (दि. २१) रात्री त्याची एमएच-४९/एम-६५१२ क्रमांकाची माेटरसायकल नेहमीप्रमाणे घरासमाेर उभी ठेवली हाेती. मध्यरात्री घराच्या परिसरात कुणीही नसताना अज्ञात चाेरट्याने ती माेटरसायकल चाेरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने त्याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. या माेटरसायकलची किंमत २० हजार रुपये असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार डाेंगरे करीत आहेत.