रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:09 AM2018-10-11T01:09:44+5:302018-10-11T01:12:31+5:30

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Four thieves arrested while snatching mobile and purse of passenger | रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चौघांना अटक

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चौघांना अटक

Next
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : लोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
बुधवारी सकाळी ६.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आरपीएफचे कामसिंह ठाकुर, जाहिद खान यांना १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळली. तिने आपले नाव असलम खान अहमद खान (१९) रा. अमरावती संगितले. त्याच्याजवळ एक मोबाईल, आधारकार्ड आढळले. त्याची चौकशी सुरु असताना मोबाईलवर नीलेश त्रिवेदी रा. बीहर, सरबरिया, पन्ना, मध्यप्रदेश यांचा फोन आला. प्रवासात नागपूर रेल्वेस्थानकावर अज्ञात आरोपीने त्यांचा ११५०० रुपये किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल पळविल्याचे सांगितले. दुसºया घटनेत सकाळी १०.३० वाजता उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना १५०२३ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. त्याने आपले नाव बारबी राजा बी केसवन (३८) रा. रामजीनगर, त्रिचनापल्ली सांगितले. आपल्यासोबत चार साथीदार असून रेल्वेगाड्यात चोºया करीत असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याजवळ २१५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली लेडीज पर्स आढळली. दुपारी ४ वाजता हेमंत शरद गुई हे आरपीएफ ठाण्यात आले. त्यांनी संत्रा मार्केट भागात तिकीट काढताना त्यांचे २६० रुपये असलेले पाकिट चोरीला गेल्याचे सांगितले. आरपीएफने सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या खिशातील पाकिट काढणाºया आरोपीचा शोध घेतला. आरोपी प्लॅटफार्म क्रमांक ८ वर इटारसी एण्डकडील भागात असल्याचे दिसताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीने आपले नाव मुकद्दर खान लाल खान (२३) रा. सोनटक्के नगर, ख्वाजानगर, अकोला सांगितले. तर चौथ्या घटनेत सायंकाळी ५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर विदर्भ एक्स्प्रेसमधून प्रवाशाचे पाकिट चोरी करणाºया विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. पाकिटात हजार रुपये आणि लायसन्स होते. चारही गुन्ह्यातील आरोपींना मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.
शालिमार एक्स्प्रेसमधून ३० किलो गांजा जप्त
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी शालिमार एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी करीत असलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३० किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दपु मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी रेल्वेगाडी क्रमांक १८०३० शालिमार एक्स्प्रेसमध्ये दुर्ग-गोंदिया दरम्यान तपास केला. दरम्यान, आरपीएफला दोन विधिसंघर्षग्रस्त बालक दोन बॅगसह संशयास्पद स्थितीत आढळले. आपण राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील बुंदी येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशयाच्या आधारे त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता, त्यात दोन कथ्थ्या रंगाचे पाकीट आढळले. पाकिटाबाबत विचारणा केली असता, त्यांनी गांजाची तस्करी करीत असल्याची कबुली दिली. गांजाचे वजन केले असता ते ३० किलो भरले. त्यानंतर जप्त केलेला गांजा आणि विधिसंघर्षग्रस्त बालकांना गोंदिया लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई दपु मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उपनिरीक्षक एस. एस. बघेल, सहायक उपनिरीक्षक एस. के. साहू, हेड कॉन्स्टेबल आर. सी. कटरे, पी. रायसेडाम, ईशांत दीक्षित, आर. सी. धुर्वे, एस. बी. मेश्राम यांनी पार पाडली.

 

Web Title: Four thieves arrested while snatching mobile and purse of passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.