चार वर्षीय ऋषभचा कॅन्सरशी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:16+5:302021-03-27T04:07:16+5:30
नागपूर : कॅन्सर या आजाराचे नाव घेताच पायाखालची जमीन सरकते. हा आजार झारखंड राज्यातील कोलेबिरा या छोट्याश्या गावातील ४ ...
नागपूर : कॅन्सर या आजाराचे नाव घेताच पायाखालची जमीन सरकते. हा आजार झारखंड राज्यातील कोलेबिरा या छोट्याश्या गावातील ४ वर्षीय चिमुकला ऋषभ कश्यप याला झाला आहे. नागपुरातील एका रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहे. पण आज ऋषभसाठी पैसा मोठा झाला आहे. या भयंकर प्रसंगातून कुठूनतरी मिळणारी मदत त्याला जगवू शकणार, या अपेक्षाने वडिलांचे पराकोटीचे प्रयत्न सुरू आहे.
ऋषभ २ वर्षाचा असताना ऋषभला ब्लड कॅन्सर या जीवघेण्या आजाराने ग्रासले. त्याला आजाराची लागण झाल्याचे कळताच अख्खे कुटुंबच हादरले. झारखंडच्या कोलेबिरा या छोट्याशा गावातून उपचाराला सुरूवात झाली. गेल्या तीन महिन्यापासून ऋषभ आईवडिलांसोबत नागपुरात उपचार घेत आहे. ऋषभचे वडील दिवाकर यांचे गावात छोटेसे किराणा दुकान आहे. आतापर्यंत ८ ते ९ लाख रुपये त्याच्या उपचारावर खर्च झाले आहे. सद्यस्थितीत ऋषभची शारीरिक स्थिती फार खालावली आहे. डॉक्टरांनी त्याच्या उपचारावर ३० लाख रुपयांचा खर्च येणार असे सांगितले आहे. वडिलांजवळ होता नव्हता तेवढा पैसा आतापर्यंत उपचारासाठी लावला आहे. आता मात्र पैशाअभावी त्याचे उपचार थांबले आहे.
- एक छोटी मदत देऊ शकते जीवनदान
ऋषभच्या वडिलांनी झारखंडमध्ये मुख्यमंत्री निधीसाठी अर्ज केला आहे. तेथील राजकीय नेत्यांकडेही त्यांनी हात पसरले आहे. परंतु अजूनही मदत झालेली नाही. नव्या शहरात पैसा नसल्याने ते हतबल झाले आहे. ऋषभच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना ७००४९१९९६७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.