हल्दीराम कंपनीची फसवणूक : ४० लाखांच्या मालाची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 09:49 PM2020-10-01T21:49:53+5:302020-10-01T21:53:17+5:30

सुप्रसिद्ध हल्दीराम ग्रुप ऑफ कंपनीजमधील ऑनलाईन विकलेल्या मालाची अफरातफर करून तिघांनी कंपनीला ४० लाखांचा गंडा घातला. डिसेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२० कालावधीत झालेल्या या अफरातफरीची माहिती उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Fraud of Haldiram Company: Fraud of goods worth Rs 40 lakh | हल्दीराम कंपनीची फसवणूक : ४० लाखांच्या मालाची अफरातफर

हल्दीराम कंपनीची फसवणूक : ४० लाखांच्या मालाची अफरातफर

Next
ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुप्रसिद्ध हल्दीराम ग्रुप ऑफ कंपनीजमधील ऑनलाईन विकलेल्या मालाची अफरातफर करून तिघांनी कंपनीला ४० लाखांचा गंडा घातला. डिसेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२० कालावधीत झालेल्या या अफरातफरीची माहिती उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हरीश ऊर्फ भोलू ज्ञानेश्वर गावंडे, रामकृष्ण पुनाजी पाटील आणि राजेश मदनलाल गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी हरीश गावंडे हा हल्दीराम कंपनीच्या ओम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ऑनलाईन विक्री विभागाचा व्यवस्थापक होता तर रामकृष्ण पाटील आणि राजेश गुप्ता हे दोघे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी असोसिएट आहेत. डिसेंबर २०१७ ते २८ सप्टेंबर २०२० दरम्यान हल्दीराम कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केलेला माल ग्राहकापर्यंत पोचवला. मात्र विविध कारणांमुळे ग्राहकांनी ऑर्डर रद्द केल्यानंतर परत आलेल्या मालाची कंपनीत नोंद केली नाही. हा माल परस्पर बाहेर विकून त्या मालाची रक्कम अंदाजे ३५ ते ४० लाख रुपये आरोपी गावंडे, पाटील आणि गुप्ता त्या तिघांनी हडपली. कंपनीच्या लेखा विभागातून वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचली. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक श्रीनिवासराव सांबशिवराव विणहकोट यांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमांनुसार उपलब्ध आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Fraud of Haldiram Company: Fraud of goods worth Rs 40 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.