योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते किंवा महामार्गावर वाहने चालवत असताना समोरच्याच्या पुढे जाण्यासाठी अनेकजण नियमांचा भंग करताना दिसून येतात. मात्र हीच अतिघाई बरेचदा जीवावर बेतते. वाहनावरील ताबा सुटतो व निष्पापांच्या जीवावर आघात होतो.
२०१९ साली नागपुरात १ हजार ११९ रस्ते अपघात झाले. त्यात एकूण २७० नागरिकांचा बळी गेला व ८९९ लोक जखमी झाले. हे सर्व अपघात एकतर ओव्हरटेकिंग, अतिवेग किंवा दारुच्या नशेत वाहने चालविल्यामुळे झाले. यातील तब्बल ६४ टक्के अपघात हे ओव्हरटेकिंगच्या नादात झाले. तर या कारणामुळे १५९ लोकांना जीव गमवावा लागला. त्या खालोखाल अतिवेगामुळे ३८६ अपघात झाले व त्यात ११० लोकांचा मृत्यू झाला.दरम्यान, २०१५ ते २०१९ च्या आकडेवारीकडे नजर टाकली असता नागपुरातील रस्ते अपघातांमध्ये घट होत असल्याचे चित्र दिसून आले. २०१५ मध्ये शहरात १ हजार ३९७ अपघातांची नोंद झाली होती व त्यात ३१७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये हाच आकडा १ हजार ५७४ अपघात व ३९६ मृत्यूंवर गेला होता. त्यानंतर सातत्याने अपघातांची संख्या व मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा कमी होत आहे.दुचाकीस्वारांना बसतोय फटकाअतिवेग किंवा ओव्हरटेकिंगच्या नादात होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी हे दुचाकीस्वारांचेच जात असल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये रस्ते अपघातात १२२ दुचाकीस्वारांचा जीव गेला. त्याखालोखाल ट्रक-ट्रॉलीतील ८१ व कारमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला. विविध अपघातात १० पादचाऱ्यांचा हकनाक बळी गेला.मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारीवाहन प्रकार मृत्यूट्रक-ट्रॉली ८१बस १५कार २३जीप ७आॅटोरिक्षा ९दुचाकी १२२सायकल २पादचारी १०एकूण २७०