गडकरी, दर्डांच्या मैत्रीने केले आश्चर्यचकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:20 PM2019-02-09T22:20:25+5:302019-02-09T22:22:14+5:30
शुक्रवारी रात्री सीताबर्डीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. जेव्हा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे पकोडे खाण्यासाठी पोहचले. यावेळी कुठलाही व्हीव्हीआयपी बंदोबस्त नव्हता. कुठलाही तामझाम नव्हता. दोघेही पकोडावाला यांच्याकडे अगदी कौटुंबिक वातावरणात पकोड्यांचा आस्वाद घेताना दिसले. दोघांची मैत्री बघून उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले. अनेकांनी सेल्फी काढून हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी रात्री सीताबर्डीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. जेव्हा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे पकोडे खाण्यासाठी पोहचले. यावेळी कुठलाही व्हीव्हीआयपी बंदोबस्त नव्हता. कुठलाही तामझाम नव्हता. दोघेही पकोडावाला यांच्याकडे अगदी कौटुंबिक वातावरणात पकोड्यांचा आस्वाद घेताना दिसले. दोघांची मैत्री बघून उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले. अनेकांनी सेल्फी काढून हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
गडकरी व दर्डा यांची मैत्री जुनी आहे. दोघांनी शुक्रवारी प्रयागराजमध्ये कुंभस्नान केले. त्याचवेळी त्यांनी नागपुरात पोहचून पकोडावाला यांच्याकडे पकोड्यांचा स्वाद घेण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार गडकरी हे मुलगा सारंग, सून ऋतुजा व मधुरा, नातू निनाद व अर्जुन, नात सान्वी व नंदिनी आणि विजय दर्डा यांच्यासोबत रात्री १० वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये पोहचले. त्यांना बघून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. लगेच हॉटेल मालकाने त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केली. पहिले पकोडे मागविण्यात आले. यावेळी हॉटेलमध्ये कौटुंबिक वातावरण झाले होते. बऱ्याच दिवसानंतर आजोबांसोबत बाहेर निघाल्यामुळे नातूही आनंदी होते. मुलांच्या मागणीकडे दोघांनीही विशेष लक्ष दिले. दर्डा यांनी त्यांच्यासाठी पेस्ट्री व दूध मागविले. या दरम्यान हॉटेलमध्ये उपस्थित लोकांमध्ये उत्साह संचारला होता. आजूबाजूचेही लोक तिथे गोळा झाले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतल्या. दोघांची मैत्री बघून अनेकांना कुतूहल वाटले.
गुप्ता परिवारही आश्चर्यचकित
पकोडेवाला प्रतिष्ठानचे संचालक गुप्ता व त्यांचे कुटुंबीय गडकरी व दर्डा यांना अचानक आपल्या हॉटेलमध्ये बघून आश्चर्यचकित झाले. यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेले राजेंद्र गुप्ता, राधेश्याम गुप्ता व अशोक गुप्ता म्हणाले की, गडकरी व दर्डा यांना अचानक हॉटेलमध्ये बघून काहीच सुचले नाही. आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले.