नागपूर : शासनाने विकास कामासाठी कितीही निधी मंजूर केला तरी तो खेचून आणण्याचे कौशल्य संबंधित मंत्र्याला दाखवावे लागते. कारण मंत्रालयात ‘ना’चा ठप्पा घेऊनच अनेक (अधिकारी) जण बसले आहेत. प्रगतीच्या चाकाला खीळ घालून ते पंक्चर करण्यात ‘ही मंडळी’ तरबेज आहेत, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे पोलीस भवन वास्तूच्या भूमिपूजन सोहळ््यात केली.निधी खेचून (मंजूर निधीची फाईल ओ. के. करून) आणण्यात यश मिळवले तरच विकास साधला जाऊ शकतो. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ते कौशल्य साधले आहे, असे मिश्किल वक्तव्य गडकरी यांनी केले.पोलिसांनी मित्र म्हणून वागावे - मुख्यमंत्रीसीसीटीएनएस प्रणालीचा प्रभावी वापर करून क्राईम डाटा तयार करणारे तसेच ई-कम्प्लेंटची सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र पोलीस देशात पहिले ठरले आहे. ई-तक्रारीमुळे पोलिसांची जबाबदारी निश्चित झाली असून, त्यामुळे एफआयआरमध्ये खोडतोड करणे किंवा पळवाटा काढण्याच्या प्रकाराला आता संधी नाही. त्यामुळे पोलिसांनी यापुढे जनतेचे मित्र म्हणून अधिक सौजन्याने वागण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विकासाचा वेग रोखणारे मंत्रालयातच- गडकरी; नागपुरला पोलीस भवनचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 3:26 AM