लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत मोठ्या प्रमाणात खासगीकरण करण्यात येत आहे. परंतु आम्ही रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नसून कर्मचाऱ्यांनी त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज रहावे, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेचे कार्यकारी अध्यक्ष तथा सेंट्रल रेल्वे मजदुर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांनी केले.सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने खासगीकरणाच्या विरुद्ध ‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले. द्वारसभेला मार्गदर्शन करताना सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ. प्रवीण बाजपेयी म्हणाले, मागील ६० वर्षांपासून महागाई भत्ता ३ एसी सुविधा पास, कॅडर रिस्ट्रक्चरिंग आदी कामे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहेत. परंतु यापासून आम्ही समाधानी नसून जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार आहोत. विभागीय संघटक गोविंद शर्मा, मुख्यालयाचे सदस्य राकेश कुमार यांनी रेल्वे गाड्यांना खासगी उद्योगपतींच्या हाती सोपविण्याच्या निर्णयास विरोध दर्शविला. या संघर्षात रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. द्वारसभेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सी. पी. सिंह, युजिन जोसेफ, शिवाजी बारसकर, विजय बुराडे, राकेश कुमार, जगदंबा सिंग, अनिल राठोड, बंसमनी शुक्ला, प्रमोद खिरोडकर, सचिन लाखे, प्रफुल्ल तारवे, ओ. पी. शर्मा, बी. एस. ताकसांडे, आर. ओ. रंगारी, राज पासवान, दिनेश आत्राम, सुनील सूर्यवंशी, पीयूष सुरेश, शब्बीर खान, सचिन बोंद्रे, आकाश मेश्राम, चंद्रशेखर पांडे, दिनेश घरडे, संजय धाबर्डे, कुंदन कुमार, रामबहादुर सिंग उपस्थित होते. संचालन युजिन जोसेफ यांनी केले. आभार वीरेंद्र सिंह यांनी मानले.