तरुणीच्या आंघोळीचा व्हिडीओ बनविला : नागपूरच्या धंतोली भागातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 08:47 PM2017-11-27T20:47:45+5:302017-11-27T20:54:37+5:30
आंघोळ करताना एका तेवीस वर्षीय तरुणीचा वस्तीतील एका तरुणाने लपून व्हिडीओ बनविला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणीने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : आंघोळ करताना एका तेवीस वर्षीय तरुणीचा वस्तीतील एका तरुणाने लपून व्हिडीओ बनविला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणीने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नयन मिलिंद मून (वय २५), असे आरोपीचे नाव आहे. तो धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तक्रारदार तरुणी भोपाळची रहिवाशी आहे. ती कामाच्या निमित्ताने अधून मधून नागपुरात येते. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती आंघोळ करीत असताना बाजूला राहणाऱ्या नयनने बाथरूमच्या खिडकीतून तिचा मोबाईलवरून व्हिडीओ तयार केला. तरुणीचे खिडकीकडे लक्ष गेल्यानंतर तिला आरोपीचे तोंड दिसले. तिने लगेच आरडाओरड केली. त्यानंतर शेजाऱ्यांना हा प्रकार माहीत झाला. तरुणीसह बाजूची मंडळी संतप्त झाल्याचे पाहून आरोपीने तो व्हिडीओ डिलिट केला. नंतर तरुणीने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी नयन मूनविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.