इंदोऱ्यात समाजभवनासाठी जमीन द्या : दिवाणी दावा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 08:00 PM2020-05-28T20:00:11+5:302020-05-28T20:01:33+5:30
इंदोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने समाजभवन बांधण्याकरिता नझुलची जमीन मिळावी यासाठी अॅड. प्रियदर्शनी वानखेडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला समन्स बजावून हजर होण्याचा आदेश दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने समाजभवन बांधण्याकरिता नझुलची जमीन मिळावी यासाठी अॅड. प्रियदर्शनी वानखेडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला समन्स बजावून हजर होण्याचा आदेश दिला आहे.
इंदोरा येथे अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे या परिसरात समाजभवन बांधण्याची गरज आहे. त्याकरिता येथे नझुलची जमीन उपलब्ध आहे. यापूर्वी ती जमीन आधी लक्ष्मणदास बजाज यांना व त्यानंतर त्यांचा मुलगा गिरधर बजाज यांना वाटप करण्यात आली. परंतु, ती जमीन गेल्या ५० वर्षांपासून रिकामी व निरुपयोगी पडली आहे. परिणामी, ती जमीन समाजभवनासाठी देण्यात यावी असे वानखेडे यांचे म्हणणे आहे. वानखेडे यांच्यातर्फे अॅड. नीतेश समुंद्रे यांनी कामकाज पाहिले.