जास्तीत जास्त युवकांना तिकीट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:08 AM2021-06-24T04:08:32+5:302021-06-24T04:08:32+5:30

- युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे मागणी : नेत्यांविरूद्ध व्यक्त केली नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : युवक ...

Give tickets to as many young people as possible | जास्तीत जास्त युवकांना तिकीट द्या

जास्तीत जास्त युवकांना तिकीट द्या

Next

- युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे मागणी : नेत्यांविरूद्ध व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : युवक काँग्रेसचे बुधवारी शहरात आलेले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास यांच्याकडे मनपा निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना तिकीट देण्याची मागणी केली. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी असलेली नाराजीही व्यक्त केली.

बी.वी. श्रीनिवास यांचे आज सकाळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथून ते बालाघाटकडे रवाना झाले. दरम्यान शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना युवक काँग्रेसमुळेच शहरात काँग्रेस जिवंत असल्याचे सांगितले. अनेक आंदोलनांमुळे कार्यकर्त्यांवर पोलिसात चार्जेसही लागले. परंतु, कोणत्याही मोठ्या नेत्याने मदत केली नाही. त्यामुळे, युवक काँग्रेसच्या सक्रिय सदस्यांनाच मनपा निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तत्पूर्वी बी.वी. श्रीनिवास यांचे भव्य स्वागत झाले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके व प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले होते. शेळके यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना यावेळी नागपुरात संघटनेद्वारे सुरू असलेल्या कार्यांची माहिती दिली. नगरसेवक दिनेश यादव, नेहा निकोसे, राकेश निकोसे, सुरेश पाटील, दीपक खोब्रागड़े, अजित सिंह, असद खान, आसिफ शेख, इरशाद शेख, सतीश पाली, गौतम अंबादे, ज्योति खोब्रागड़े, नीलेश खोब्रागड़े यावेळी उपस्थित होते. श्रीनिवास यांनी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्व. धीरज पांडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

................

Web Title: Give tickets to as many young people as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.