कारच्या काचा फाेडून राेख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:13+5:302021-03-10T04:10:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पाेलीस ठाण्याच्या आवाराच्या सुरक्षा भिंतीलगत असलेल्या कारच्या काचा फाेडून चाेरट्याने आत ठेवलेली बॅग लंपास ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाेलीस ठाण्याच्या आवाराच्या सुरक्षा भिंतीलगत असलेल्या कारच्या काचा फाेडून चाेरट्याने आत ठेवलेली बॅग लंपास केली. त्या बॅगमध्ये २ लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने पाेलिसांना दिली. ही घटना रामटेक शहरात मंगळवारी (दि. ९) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
माेहम्मद सादिक अब्दुल रशिद, रा. गांधीबाग, नागपूर हे काही कामानिमित्त त्यांच्या एमएच-३१/ईए-३३६४ क्रमांकाच्या कारने मंगळवारी दुपारी रामटेक शहरात आले हाेते. त्यांनी त्यांची ही कार रामटेक शहरातील पाेलीस ठाण्याच्या आवाराच्या सुरक्षा भिंतीलगत उभी केली व ती लाॅक करून कामानिमित्त शहरातील तहसील कार्यालयात गेले. काम आटाेपून ते परत आले असता, त्यांना कारच्या काचा फुटल्या असल्याचे तसेच आतील बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
परिणामी, त्यांनी या घटनेची माहिती पाेलिसांना दिली. शिवाय, त्या बॅगमध्ये २ लाख ४० हजार रुपये असल्याचेही त्यांनी पाेलिसांना सांगितले. पाेलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रमाेद काेडेकर करीत आहेत.
...
रामटेक शहरातील पहिलीच घटना
माेहम्मद सादिक अब्दुल रशिद यांनी ही रक्कम चलान भरण्यासाठी आणली हाेती. भारतीय स्टेट बँकेच्या रामटेक शाखेतील इंटरनेट नेटवर्क नसल्याने त्यांना चलान भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी ती रक्कम पुन्हा बॅगेत व ती बॅग कारमध्ये ठेवून दुसऱ्या कामासाठी तहसील कार्यालयात निघून गेले. याच काळात चाेेरट्याने कारच्या काचा फाेडून ती बॅग लंपास केली. त्यामुळे चाेरटा हा लक्ष ठेवून असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. शिवाय, अशा प्रकारची रामटेक शहरातील ही पहिलीच घटना असून, पाेलिसांनीही याला दुजाेरा दिला आहे.