फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:20 PM2020-07-28T23:20:40+5:302020-07-28T23:22:40+5:30

शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छिबाजार आदी भागाला मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. फूटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तिकारांवरही दंडात्मक कारवाई करून फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त करण्यात आले.

Goods worth lakhs of rupees seized on footpath: Action taken by Municipal Commissioner | फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देमूर्तिकारांसह दुकानदारांना ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छिबाजार आदी भागाला मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. फूटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तिकारांवरही दंडात्मक कारवाई करून फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त करण्यात आले.
कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर गर्दी होणे ही अत्यंत धोकादायक असल्याने तुकाराम मुंढे यांनी गांधीबाग झोन क्षेत्रात आकस्मिक दौरा केला. नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर ५ ते १० दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
प्रारंभी आयुक्तांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील फूटपाथवर सामान ठेवणाऱ्या दुकानदाराकडून १० हजाराचा दंड वसूल केला. गोळीबार चौकातील जागनाथ बुधवारी भागात अनेक किराणा दुकानांमध्येही तीच स्थिती दिसून आली. त्यांच्यावरही १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुढे मस्कासाथ बंगाली पंजा, इतवारी भागात काही किराणा दुकानांनी फूटपाथवर अतिक्रमण करून सामान ठेवले होते तर काहींनी फूटपाथवरच दुकान मांडले होते. अशा दुकानदारांनाही यापुढे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास सामान जप्त करण्याचा इशारा देत त्यांच्याकडून ५ व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

दुकानदारांना दिली ताकीद
मच्छिबाजार जुने मोटार स्टँड भागात हार्डवेअर विक्रेत्यांनी संपूर्ण साहित्य फूटपाथवर ठेवले होते. आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला बोलवून संपूर्ण साहित्य जप्त केले. या भागातील दोन हार्डवेअर दुकानांचे बरेच सामान फूटपाथवर ठेवले होते. या सामानाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. पाईप, लोखंडी साहित्य, ट्रक व बुलडोझरचे टायर, लोखंडी पत्रे आदी साहित्यांवर जप्तीची कारवाई करून अतिक्रमण विरोधी पथकाच्या ट्रकमध्ये टाकण्यात आले. याच भागात चप्पल आणि बुट विक्री करणाऱ्याने थेट फूटपाथवरच दुकान मांडले होते. त्यांनी दंड भरल्याने जप्तीची कारवाई टळली असली तरी यापुढे फूटपाथवर दुकान न लावण्याची सक्त ताकीदही आयुक्तांनी दिली.

मूर्तिकाराकडून दंड वसूल
चितारओळीत मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. या ठिकाणी आयुक्तांनी मूर्तिकारांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मूर्ती ठेवल्याने अतिक्रमणाच्या कारवाई अंतर्गत सर्व मूर्तिकारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.

-तर २५ हजार रुपये दंड
शहरात नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करीत सध्या ५ व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. शहरातील नागरिकांसह दुकाने, आस्थापनांना शिस्त लागावी. नियमांचे पालन व्हावे व रस्ते, फूटपाथ मोकळे राहावेत या उद्देशाने ही कारवाई केली जाते. मात्र दंड भरूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करणे सोडत नाही. यापुढे नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्यास पुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.

Web Title: Goods worth lakhs of rupees seized on footpath: Action taken by Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.