लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या नशेत टून्न असलेल्या आरोपींनी इंदोऱ्यात गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास प्रचंड हैदोस घातला. घरावर दगडफेक करून, खिडक्यांची तावदाने, कुलर फोडले. घरासमोर ठेवलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे इंदोरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.आरोपी राजू काशीनाथ ढवळे (वय ४८), छोटू राजू ढवळे (वय १८, दोघेही रा. भीमसेना नगर), सरदार नागफाससिंग सुदुरिया (वय, रा. पंजाबी लाईन इंदोरा), राकेश सुधाकर शेंडे (वय ३३) आणि सुधाकर कृष्णा अवसरे (वय ३०, रा. इंदोरा) हे सर्व इंदोरात गुरुवारी रात्री संदेश दहाट यांच्या घरासमोर भांडण करीत होते. याच भागात राहणारे कैलास हरीशचंद्र आवळे (वय ५०) आणि अन्य काही जणांनी आरोपींची समजूत काढून त्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, आरोपींनी जास्तच आक्रमक होत अनेकांना मारहाण केली. लाठ्याकाठ्यांनी घराच्या खिडक्यांची तावदाने फोडली. कुलर फेकून मोडतोड केली एवढेच नव्हे तर घरासमोर ठेवलेल्या अनेक वाहनांचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. आवळे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
उत्तर नागपुरातील इंदोऱ्यात गुंडांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 10:07 PM
दारूच्या नशेत टून्न असलेल्या आरोपींनी इंदोऱ्यात गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास प्रचंड हैदोस घातला. घरावर दगडफेक करून, खिडक्यांची तावदाने, कुलर फोडले. घरासमोर ठेवलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे इंदोरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
ठळक मुद्देअनेकांना मारहाण : वाहनांची तोडफोड, बापलेकांसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल