लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सावरकर यांचा त्याग हे राहुल गांधींना माहिती नाही. राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे. सावरकरांचे बलिदान राहूल गांधी यांना माहित नाही. गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही. आम्ही या विषयावर राहूल गांधी यांना निश्चितच माफी देऊ शकत नाही.सातबारा कधी कोरा होणार व सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा. ही सर्व त्यांचीच आश्वासन होती. तीच आठवण करून देत आहोत. सरकारला शेतक?्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली. महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. राज्यात असंतोष, स्थगिती अशीच राहणार का ?याचा महाराष्ट्राच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. गुंतवणूकदारांवर परिणाम होतोय. सरकारने तत्काळ काम सुरु करावी. राष्ट्रीय पेयजलची कामे सुरू करावी. उन्हाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावी . सरकारमध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये देण्यात येत आहे. कर्जाचा आकडा फुगवला जात आहे. आकड्यांची जगलरी केली जात आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे कारण सांगून हात वर करू नये सरकारने. सेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती. तेव्हा एकमताने निर्णय झाले होते. आता त्याच सेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. सेनेची तेव्हा आमच्याइतकीच जबाबदारी होती, त्यांना उत्तर द्यावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. चचेर्ची संधी दिली नाही तर आक्रमकपणे विविध आयुध वापरू. सत्तेतील।पक्षांत विसंवाद आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे.
राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 1:51 PM
सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली.
ठळक मुद्देचहापानावर बहिष्कार घालणारराहूल गांधी यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे