महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:07 AM2021-04-16T04:07:32+5:302021-04-16T04:07:32+5:30

कळमेश्वर : नगर परिषद येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी न.प. उपाध्यक्ष ज्याेत्स्ना मंडपे, नगरसेवक ...

Greetings to Mahamanwala | महामानवाला अभिवादन

महामानवाला अभिवादन

Next

कळमेश्वर : नगर परिषद येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी न.प. उपाध्यक्ष ज्याेत्स्ना मंडपे, नगरसेवक सत्यवान मेश्राम, महादेव ईखार, सामाजिक कार्यकर्ते सरजू मंडपे, प्रकाश आकरे, धर्मेंद्र साखरकर, संताेष कुरडकर व कर्मचारी उपस्थित हाेते. तसेच रेल्वे स्टेशन राेड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून मान्यवरांनी मानवंदना दिली. यावेळी ज्याेत्स्ना मंडपे, सत्यवान मेश्राम, सरजू मंडपे, युवराज मेश्राम, श्रीराम भिवगडे, महेंद्र सातपुते आदी उपस्थित हाेते.

.....

पंचशील बुद्धविहार काटाेल

काटाेल : स्थानिक पंचशील बुद्धविहारात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी सलग १० तास अभ्यास करीत महामानवाला अभिवादन केले. याप्रसंगी प्रा. अरुण साेमकुवर, विवेक गायकवाड, प्रशांत शेंडे, पंकज उके, सुषमा सहारे, सरिता रामटेके, ममता गाखरे, मुकेश साेनटक्के, अंकिता मेश्राम, श्वेता गाखरे, धनंजय उमप, अनिकेत शेंडे, पंकज भस्मे, आरती कुमरे, काजल कठाणे, विशाखा शिरपूरकर, नीलम काैरती, प्रिया लाड आदी उपस्थित हाेते.

....

अनाथपिंडक बुद्धविहार महादुला

काेराडी : महादुला येथील अनाथपिंडक बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त भागरथाबाई बागडे यांनी विहाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्तंभाचे धम्मदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माताजी बुद्धप्रिया हाेत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष राजेश रंगारी, बुद्धविहार समिती अध्यक्ष पंकज ढोणे, रवी चौरे, प्रकाश खिल्लारे, राजू साळवे, शैलेश ठवरे, त्रिशरण अंबोरे, देवानंद वाठोरे, महिला मंडळ अध्यक्ष धनश्री अंभोरे व महिलांची उपस्थिती हाेती.

.....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती उमरेड

उमरेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी आमदार राजू पारवे, आर. बी. गजघाटे, सूरज इटनकर, उपविभागीय पोलीस अभिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, विशाल देशमुख, राजेश भेंडे, योगीता इटनकर, रंजना बारेकर, रेणुका कामडी, रामेश्वर सोनटक्के, बळीराम नवनागे, शत्रुघ्न शंभरकर, पांडुरंग धनविजय, बाबूराव कठाणे, अभिमन्यू गजघाटे, उपासराव बहादुरे, सुरेश मंडपे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन एस. पी. मेश्राम यांनी केले. सुरेंद्र बावनगडे, कैलास गजघाटे, महेंद्र धारगावे, प्रशिक नवनागे, मोनू नवनागे, अमोल खोब्रागडे, स्वप्निल गवळी आदींनी सहकार्य केले.

रमाबाई महिला विकास मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सोमेश माटे, नीलकंठ मांडवकर, सिद्धार्थ मोटघरे, विशाखा मोटघरे, दीक्षा पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सत्यजित गणवीर यांनी केले. आभार काशी माटे यांनी मानले.

Web Title: Greetings to Mahamanwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.