नागपूर : लॉकडाऊनच्या काळात इतवारी मस्कासाथ घाऊक किराणा ओळीतील दुकाने शनिवार व रविवारी बंद राहणार आहेत. याशिवाय बाजारपेठ शुक्रवारपासून सकाळी ९ ते दुपारपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय इतवारी किराणा ओळ असोसिएशनने घेतला आहे.
कोरोना संक्रमणाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण असून, दरदिवशी रुग्णांची संख्या वाढत असल्यावर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशचंद्र गोयल आणि सचिव यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवसांत नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन गोयल यांनी केले आहे. असोसिएशनच्या पुढील सूचनेपर्यंत इतवारी मस्कासाथ या भागातील जवळपास ४०० पेक्षा जास्त किराणा दुकाने बंद राहतील, असे सेदानी यांनी स्पष्ट केले.