दिमाखदार होणार गडकरींचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

By Admin | Published: May 25, 2017 01:41 AM2017-05-25T01:41:29+5:302017-05-25T01:41:29+5:30

भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय रस्ते व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

Happy Birthday Celebrations of Gadkari | दिमाखदार होणार गडकरींचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

दिमाखदार होणार गडकरींचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

googlenewsNext

सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग : एक कोटी एक लाखांचा धनादेश देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय रस्ते व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने कस्तूरचंद पार्क येथे आयोजित समारंभात गडकरी यांचा भाजपा व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य हितचिंतकाद्वारे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती गठित करण्यात आली आहे.
या समारंभात भाजपाचे आमदार व खासदारांनी गोळा केलेला एक क ोटी एक लाखांचा निधी भेट म्हणून दिला जाणार आहे. हा निधी सेवाभावी संस्थांना देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री व गौरव समितीचे संयोजक चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह देशभरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरातील आमदार, खासदार व विविध क्षेत्रातील मान्यवर गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत.
या कार्यक्रमाला जवळपास ५० हजार लोक उपस्थित राहतील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. यावेळी समितीचे सहसंयोजक गिरीश गांधी, भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, अजय पाटील, रमेश मानकर, संजय फांजे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
२७ मे रोजी सायंकाळी ५.३० ला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले व वैशाली सावंत यांच्या सुमधूर मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने या समारंभाची सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजता मंचावर प्रमुख अतिथींचे आगमन होईल.

पार्किंगची व्यवस्था
बिशप कॉटन मैदान,महापालिका मुख्यालय, जुने कॅ थलिक चर्च, सरपंच भवन, हिस्लॉप कॉलेज, नाग विदर्भ चेम्बर आॅफ कॉमर्स, तिडके महाविद्यालय, सदर येथील टायगर गॅप ग्राऊ ंड, स्टेट बँक मुख्यालय, रेल्वे स्टेशन, रेल्वे डी.आर.एम. कार्यालय, सेंट उर्सुला हायस्कूल, आॅल सेंट क ॅथेड्रल चर्च, एनआयटी,सीएनआय चर्च भारत टॉक ीजजवळ, नागपूर विद्यापीठ आदी ठिकाणी करण्यात आलेली आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
उन्हाळ्याचे दिवस व कार्यक्रमाला होणारी गर्दी विचारात घेता कस्तूरचंद पार्क व जवळच्या चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
भेटीची रक्कम सेवाभावी संस्थांना
राज्यातील भाजपाचे आमदार व खासदार यांच्याकडून गोळा करण्यात आलेला एक कोटी एक लाखांचा निधी गडकरी यांना भेट म्हणून दिला जाणार आहे. हा निधी कोणतेही शासकीय अनुदान न घेता सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना दान करण्याची इच्छा गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार १०० संस्थांना ही रक्कम दिली जाणार आहे. समारंभात या संस्थांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

येथे थांबविली जातील वाहने
समारंभाला होणारी गर्दी विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी ६ पासून वर्धा रोडकडून येणारी वाहने गोवारी स्मारकाजवळ, कामठी मार्गाकडून येणारी वाहने स्मृती टॉकीज व एलआयसी इमारतीजवळ, सिव्हिल लाईनकडून येणारी वाहने आकाशवाणी चौक व गांधीबागकडून येणारी वाहने स्टेट बँक इमारतीजवळ थांबविण्यात येतील. सभेसाठी सायंकाळी ६ नंतर या ठिकाणाहून नागरिकांना पायी जावे जागेल.

विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
भाजपातर्फे नागपूरसह राज्यभरात या दिवशी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात वैद्यकीय आरोग्य शिबिर, महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिर, दिव्यांगांना साहित्य वाटप, अन्नदान, रुग्णांना फळवाटप, वृक्षलागवडीचा संकल्प, रक्तदान, ग्राम सफाई, जलसंवर्धन आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

Web Title: Happy Birthday Celebrations of Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.