लाच मागणाऱ्या लोहमार्ग पोलिसावर गुन्हा दाखल

By Admin | Published: July 30, 2015 03:24 AM2015-07-30T03:24:43+5:302015-07-30T03:24:43+5:30

रेल्वेत कॉफी विकणाऱ्याला लाचेची मागणी करणाऱ्या लोहमार्ग पोलीस शिपायाविरुद्ध एसीबीने सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.

He filed a case against the railway police demanding bribe | लाच मागणाऱ्या लोहमार्ग पोलिसावर गुन्हा दाखल

लाच मागणाऱ्या लोहमार्ग पोलिसावर गुन्हा दाखल

googlenewsNext

नागपूर : रेल्वेत कॉफी विकणाऱ्याला लाचेची मागणी करणाऱ्या लोहमार्ग पोलीस शिपायाविरुद्ध एसीबीने सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. विराज शालीग्राम मते (वय ४०) असे आरोपीचे नाव असून तो लोहमार्ग पोलीस दलाच्या (जीआरपी) गुन्हेशाखेत कार्यरत आहे. गोंदिया येथील पंकज अंकलेश्वर शुक्ला हा रेल्वेत कॉफी विकतो. आरोपी मते त्याच्याकडून दरमहा एक हजार रुपये हप्ता उकळायचा. चार महिन्यांपासून त्याने हप्ता बंद केल्यामुळे मतेने त्याला यापुढे तीन हजार रुपये प्रतिमहिना हप्ता दिला तरच रेल्वेत कॉफी विकता येईल, असे बजावले. त्याचप्रमाणे गेल्या चार महिन्याचे एकूण १२ हजार रुपये मागितले. लाच द्यायची नसल्यामुळे शुक्लाने सरळ एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यावरून सापळा रचण्यात आला. सोमवारी लाचेची रक्कम सहा हजार रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी मते येणार होता. मात्र, त्याला कारवाईची कुणकुण लागल्यामुळे त्याने लाच स्वीकारण्याचे टाळले. मात्र, त्याचे लाच मागण्याचे संभाषण असल्यामुळे एसीबीचे डीवायएसपी मोहन सुगंधी, पीआय आसाराम शेटे यांनी शुक्लाविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात लाच मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: He filed a case against the railway police demanding bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.