२२० नागरिकांची आराेग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:51+5:302021-01-23T04:09:51+5:30
नरखेड : लता मंगेशकर हाॅस्पिटल, डिगडाेह, हिंगणा यांच्या वतीने नरतखेड शहरात माेफत राेगनिदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. त्यात २२० ...
नरखेड : लता मंगेशकर हाॅस्पिटल, डिगडाेह, हिंगणा यांच्या वतीने नरतखेड शहरात माेफत राेगनिदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. त्यात २२० नागरिकांच्या आराेग्याची तपासणी करण्यात आली असून, यातील ६० रुग्णांची पुढील उपचारासाठी भरती करण्याच्या उद्देशाने नाेंद करण्यात आली.
माजी आमदार डाॅ. आशिष देखमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. जवाहर चरडे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून दिनकर राऊत, किशोर राय, रत्नाकर मडके, सुदर्शन नवघरे उपस्थित होते. नरखेड शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक २ च्या आवारात आयाेजित करण्यात आलेल्या या राेगनिदान शिबिरात नागरिकांच्या आराेग्यविषयक समस्या जाणून घेत विविध चाचण्या करण्यात आल्या. यात २२० नागरिकांपैकी ६० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये माेफत उपचार केले जाणार आहेत. त्यांना आवश्यक असलेल्या विविध चाचण्या, आंतर भरती प्रक्रिया व शस्त्रक्रिया नि:शुल्क केल्या जाणार असल्याचे डाॅ. आशिष देशमुख यांनी सांगितले. हाॅस्पिटलचे डीन डॉ. काजल मित्रा, डॉ. भगत, डॉ. अनुप्रिया भडांंगे, डॉ. सुहास गजभिये, डॉ. लढ्ढा, डॉ. सायली भगत, डॉ. संदीप जाधव, डॉ. अखिलेश खोब्रागडे, डॉ. प्राजक्ता चिंधालोरे, डॉ. स्नेहा कोरडे, डॉ. रिद्धी वोरा, डॉ. दिशा मेटवानी यांनी नागरिकांना सेवा प्रदान केली. शिवाय काेराेना संक्रमण काळात सेवा प्रदान करणाऱ्या डाॅक्टरांसह इतर विभागातील कर्मचारी व नागरिकांचा डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते गाैरव करण्यात आला.