हेडगेवार रक्तपेढीला ‘एनएबीएच’ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:13+5:302021-05-16T04:09:13+5:30
नागपूर : रा.स्व.संघ लोककल्याण समिती नागपूर अंतर्गत डॉ. हेडगेवार रक्तपेढीला ‘एनएबीएच’ हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. याचे हस्तांतरण ...
नागपूर : रा.स्व.संघ लोककल्याण समिती नागपूर अंतर्गत डॉ. हेडगेवार रक्तपेढीला ‘एनएबीएच’ हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. याचे हस्तांतरण केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला रा.स्व.संघ लोकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, उपाध्यक्ष विनोद तांबी, सचिव माधव उराडे, रक्तपेढीचे डॉ. विजयकुमार तुंगार, डॉ. हर्षा सोनी, डॉ. प्रशांत अनसिंगकर, सुचेता फडणवीस व सचिव अशोक पत्की उपस्थित होते. यावेळी पत्की यांनी सांगितले, रक्तपेढीने थॅलेसेमियाचे ७० रुग्ण दत्तक घेतले असून त्यांना दर महिन्याला १२० ते १४० रक्तपिशव्या नि:शुल्क दिल्या जातात. रक्तपेढीचे ९ रक्त साठवणूक केंद्र विदर्भात कार्यरत आहेत. जिल्ह्यात सर्व ठिकाणी हे सेंटर असावे हा प्रयत्न आहे.