आपात्ग्रस्तांना मुख्यमंत्री निधीतून मदत
By admin | Published: October 16, 2015 03:22 AM2015-10-16T03:22:25+5:302015-10-16T03:22:25+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साहाय्यता निधीतून दक्षिण नागपुरातील आपात्ग्रस्तांना आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते २१ लाखांच्या मदत निधीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
दक्षिण नागपुरातील गरजूंना दिलासा : २१ लाखांच्या धनादेशाचे वाटप
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साहाय्यता निधीतून दक्षिण नागपुरातील आपात्ग्रस्तांना आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते २१ लाखांच्या मदत निधीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, भाजपचे दक्षिण नागपूरचे अध्यक्ष कैलास चुटे , तहसीलदार समर्थ आदी उपस्थित होते.
२२ मार्च २०१५ रोजी मंगरुळ येथील तलावात बुडून सात युवकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख, मिरे ले-आऊ ट येथील मृत्यू झालेल्या देवांशु अहेर याच्या नातेवाईकांना १ लाख, तसेच संजय गांधी नगर येथील आत्महत्या केलेल्या दाम्पत्याच्या दोन मुलांना २ लाखांचा धनादेश देण्यात आला. सौजारीनगर येथे घराला लागलेल्या आगीत पोटोळे यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना ५ लाखाची मदत देण्यात आली.
तसेच गरजूंना मुख्यमंत्री वैद्यकीय मदतीतून धनादेश वाटप करण्यात आले.
वीज, रस्ते व पाणी अशा सुविधा उपलब्ध करण्यासोबतच समाजात ऐक्याची भावना निर्माण होण्यासाठी लोकांची मने जुळणे गरजेचे आहे. यात खरा विकास असल्याचे सुधाकर कोहळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री निधीतून मिळणारी मदत पुरेशी नसली तरी यातून आपात्ग्रस्तांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळणार असल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्र्रमाचे संचालन अजय बुगेवार यांनी तर आभार पुरुषोत्तम कुथे यांनी मानले. नगरसेवक दीपक कापसे, नगरसेविका स्वाती आखतकर, रिता मुळे, निता ठाकरे, चंदू आखतकर, प्रवीण ठाकरे, नीलेश जैन, योगेश कासार, अतुल पांडे, बाजीराव राकस, देवा पंचभाई, मुन्ना जगताप यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)