लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय अपंग सहकारी संस्थेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले पदाधिकारी फैजी मोईन शेख (महाव्यवस्थापक), रिजवाना इशाख खान (सचिव), निर्मला शालिक गिरमकर (अध्यक्ष) व नुसरीन फैजी शेख (संचालक) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला.१७ फेब्रुवारी रोजी तहसील पोलिसांनी पेपर व्यावसायिक सत्यनारायण मालू यांच्या तक्रारीवरून या चौघांसह अन्य आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ३४ व एमपीआयडी कायद्यातील कलम ३ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आरोपींनी मालू यांना संस्थेमधून ३८ कोटी रुपयाचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले होते. मालू आरोपींच्या आमिषाला बळी पडले व त्यांनी आरोपींना सदस्यता शुल्क, सुरक्षा ठेव व प्रक्रिया शुल्कापोटी वेळोवेळी एकूण ५४ लाख ५० हजार रुपये अदा केले. त्यानंतर आरोपींनी मालू यांना कर्ज दिले नाही व त्यांची रक्कमही परत केली नाही.बेरोजगार सुशिक्षित व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु, या संस्थेने आतापर्यंत एकाही बेरोजगार सुशिक्षित व्यक्तीला कर्ज दिले नाही. २००९ ते २०१६ पर्यंतच्या लेखा परीक्षणात अनेक गैरव्यवहार आढळून आले आहेत. सध्या संस्थेच्या दोनपैकी एका बँक खात्यात केवळ २० हजार तर, दुसऱ्या खात्यात १ लाख ९५ हजार ६०० रुपये शिल्लक आहेत. आरोपींनी इतर रक्कम काढून स्वत:च्या फायद्यासाठी वापरली आहे. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.
हायकोर्ट : आर्थिक घोटाळ्यातील चार आरोपींना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:10 PM
भारतीय अपंग सहकारी संस्थेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले पदाधिकारी फैजी मोईन शेख (महाव्यवस्थापक), रिजवाना इशाख खान (सचिव), निर्मला शालिक गिरमकर (अध्यक्ष) व नुसरीन फैजी शेख (संचालक) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला.
ठळक मुद्देअटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला