हायकोर्टाचा दणका : भावावर बसवला एक लाख रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:39 AM2020-08-05T00:39:52+5:302020-08-05T00:41:20+5:30

देहव्यापार करताना अटक करण्यात आलेल्या सज्ञान बहिणीचा ताबा मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या भावावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एक लाख रुपये दावा खर्च बसवला.

High Court strike: Rs 1 lakh claim cost imposed on brother | हायकोर्टाचा दणका : भावावर बसवला एक लाख रुपये दावा खर्च

हायकोर्टाचा दणका : भावावर बसवला एक लाख रुपये दावा खर्च

Next
ठळक मुद्दे देहव्यापारातील बहिणीचा ताबा मागणे भोवले

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : देहव्यापार करताना अटक करण्यात आलेल्या सज्ञान बहिणीचा ताबा मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या भावावर मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी एक लाख रुपये दावा खर्च बसवला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अविनाश घरोटे यांनी हा दणका दिला.
सदर रक्कम नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेकडे जमा करण्यात यावी आणि संघटनेने या रकमेतून गरजू वकिलांना मदत करावी असे उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. पोलिसांनी संबंधित मुलीला देहव्यापाराच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्यानंतर मुलीला सरकारी आश्रयगृहात ठेवण्यात आले. संबंधित मुलगी सज्ञान आहे. त्यामुळे ती स्वत:च्या सुटकेकरिता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास पात्र आहे. असे असताना भावाने तिच्या सुटकेकरिता याचिका दाखल करण्याला कायदेशीर आधार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवून हा निर्णय दिला. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. के. एल. धर्माधिकारी यांनी कामकाज पाहिले. त्यांनीही सदर याचिका कायद्यात बसत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

Web Title: High Court strike: Rs 1 lakh claim cost imposed on brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.