लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांना मोक्कासह अन्य गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. तसेच, या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले.सरकार पक्षानुसार, आंबेकरविरुद्ध मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका खटल्यामध्ये रमणिकभाई पारेख साक्षीदार होता. त्यावेळी आंबेकर कारागृहात बंद होता. रमणिकभाईने सत्र न्यायालयात साक्ष देऊ नये यासाठी आंबेकरने विनोद चामटसोबत कट रचला. चामट अन्य गुन्ह्यामध्ये कारागृहात बंद होता. कारागृहातून सुटल्यानंतर चामटने बिनू शर्मा व महेंद्र भुरे यांना रमणिकभाईच्या खुनाची सुपारी दिली. शर्माने ७ जुलै २००२ रोजी रमणिकभाई व त्याच्या दोन मुलांवर गोळीबार केला. त्यामध्ये रमणिकभाई व त्यांची मुले गंभीर जखमी झाले. रमणिकभाईच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला होता. तपासादरम्यान, आंबेकरच्या कटाचा पर्दाफाश झाला. परिणामी, चारही आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सरकार पक्षाने सत्र न्यायालयात १५ साक्षीदार तपासले. त्यानंतर सत्र न्यायालयाने संशयाशिवाय गुन्हा सिद्ध झाला नसल्याचे कारण नमूद करून सर्व आरोपींना निर्दोष सोडले. त्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. हे अपील प्रलंबित असताना शर्माचा खून झाला. त्यामुळे उच्च न्यायालयाने आंबेकर, केदार व भुरेविरुद्ध अपील चालवून त्यांचे निर्दोषत्व कायम ठेवले. आरोपींतर्फे अॅड. आर. के. तिवारी यांनी बाजू मांडली.
हायकोर्टाचा निर्णय : कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर मोक्कामध्ये निर्दोषच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:34 AM
शहरातील कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांना मोक्कासह अन्य गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. तसेच, या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले.
ठळक मुद्देराज्य सरकारचे अपील फेटाळले