लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या एका वादग्रस्त ठरावावर स्थगिती दिली.आयोगाने १५ डिसेंबर २०१७ रोजी संबंधित ठराव पारित केला होता. १ जानेवारी २०१८ व त्यानंतर सुनावणीसाठी येणाऱ्या सर्व प्रकरणांवर केवळ आयोगाचे अध्यक्षांसमक्ष सुनावणी होईल व आदेशावर पुनर्विचारासाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांवर अन्य सदस्य सुनावणी घेतील, असे त्या ठरावाद्वारे निश्चित करण्यात आले होते. त्याविरुद्ध महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हा ठराव अवैध आहे. त्यामुळे ठराव रद्द करण्यात यावा असे संघटनेचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर विविध बाबी लक्षात घेता ठरावावर अंतरिम स्थगिती दिली. तसेच, ऊर्जा विभागाचे सचिव व महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.
वीज आयोगाच्या वादग्रस्त ठरावावर हायकोर्टाची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:20 AM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या एका वादग्रस्त ठरावावर स्थगिती दिली.
ठळक मुद्देमहाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेची जनहित याचिका