सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील अडथळे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:54 PM2018-03-23T23:54:13+5:302018-03-23T23:54:25+5:30

राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेले आहेत. मंजूर नकाशा आणि सौंदर्यीकरणाला शुक्रवारी नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

The highest national flag construction hurdles removed | सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील अडथळे दूर

सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील अडथळे दूर

Next
ठळक मुद्देहेरिटेज समितीची मंजुरी : लोकमत समूह व मनपाचा संयुक्त उपक्रम


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेले आहेत. मंजूर नकाशा आणि सौंदर्यीकरणाला शुक्रवारी नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य व महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्य उज्ज्वला चक्रदेव यांच्या प्रतिनिधी डॉ, नीता लांबे, नागपूर विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. शुभा जोहरी, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, नगररचना शाखा कार्यालयाचे नगररचनाकार पी.पी. सोनारे, वास्तुविशारद अशोक मोखा आदी उपस्थित होते.
कस्तूरचंद पार्क येथे देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, यासाठी मागील काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. उंच आणि २४ तास फडकणाºया राष्ट्रध्वजासंदर्भात जे नियम आहे त्या नियमांच्या अधीन राहून त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व विभागांची मंजुरी घेण्यात आली आहे. कस्तूरचंद पार्क आणि राष्ट्रध्वजासाठी असलेली जागा या दोन बाबी विभक्त होता कामा नये. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या जागेवर सुरक्षा भिंत न उभारता लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात यावे, अशी सूचना हेरिटेज समितीने केली. तसेच तेथे निर्माण करण्यात येणारे थिएटर हे ग्रीन लॅण्डस्केपमध्ये असावे, अशीही सूचना समितीने केली. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, महापालिकेच्या स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले आणि लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी बाजू मांडली.
‘झिरो माईल’ संदर्भात उपसमिती अहवाल देणार
‘झिरो माईल’ स्तंभाची दुर्दशा आणि त्याचे संवर्धन यावर अभ्यास करण्यासाठी हेरिटेज संवर्धन समितीने सदस्या उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठित केली. स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर आणि वास्तुविशारद अशोक मोखा या समितीचे सदस्य आहेत. ही समिती जागेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून हेरिटेज संवर्धन समितीकडे अहवाल सादर करेल. त्यानंतर स्तंभाच्या देखभाल, दुरुस्तीसंदर्भात समिती निर्णय घेणार आहे.

Web Title: The highest national flag construction hurdles removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.