लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसापासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते म्हणाले, राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. सरकारतर्फे पीडितेला वाचवण्याचे सर्व प्रयत्न झाले. नागपूर तसेच मुंबईतील डॉक्टरांनीदेखील प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने अपयश आले. जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.युवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा-नितीन गडकरीकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी म्हणाले, हिंगणघाट येथील जळीत घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी महाराष्ट्र शासनाने युवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा, अशी कारवाई करावी. सात दिवस या युवतीने मृत्यूशी झुंज दिली. महिलांवर होणाऱ्या अशा घटनांविरोधात कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. कायद्याच्या भीतीमुळेच या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. या घटनेबाबत महाराष्ट्र शासन गंभीर दखल घेईल,असेही ते म्हणाले.
अत्यंत दु:खद घटना -डॉ विकास महात्मेखा. डॉ. विकास महात्मे म्हणाले, हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. ही अत्यंत दु:खद घटना आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलावे. मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.
कठोर शिक्षेसाठी निश्चितच प्रयत्न -नितीन राऊतऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या निधनाच्या बातमीने समस्त महाराष्ट्राला जबर धक्का बसला आहे. पीडितेने अतिशय जिकिरीने मृत्यूशी झुंज दिली, पण नियतीपुढे आपण सारे हतबल आहोत. तिला यातना देणाºया आरोपीला कायद्याने कठोर शिक्षा द्यावी, यासाठी राज्य सरकार निश्चितच प्रयत्न करेल. यापुढे राज्यात अशी घटना घडू नये, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल.
आरोपीला महिनाभरात शिक्षा द्या : चंद्रशेखर बावनकुळेहिंगणघाट येथील जळीतकांडातील आरोपीला महिनाभरात कठोर शिक्षा देण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले, अशा घटनांची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कडक कायदा करण्यात यावा. पीडित कुटुंबातील व्यक्तीला शासनाने नोकरी द्यावी आणि आर्थिक मदतही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मानवतेला काळिमा फासणारी घटना : प्रकाश गजभियेआ. प्रकाश गजभिये म्हणाले, हिंगणघाट येथील घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल, यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. अशा घटना पुढे होणार नाही, यासाठी सरकार विशेष पाऊल उचलणार आहे. तरुणींनी कुठल्याही छेडखानीला न घाबरता पालकांना सांगून पोलिसात तक्रार करावी, यामुळे अशा घटनांना आळा बसेल.