- तर कसे मारणार बसपा मैदान ?

By admin | Published: February 19, 2017 02:15 AM2017-02-19T02:15:23+5:302017-02-19T02:15:23+5:30

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत बसपाच्या ७० ते ८० जागा निवडून आणण्याचा दावा प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रदेश प्रभारी उपासक

How to kill BSP? | - तर कसे मारणार बसपा मैदान ?

- तर कसे मारणार बसपा मैदान ?

Next

प्रदेशाध्यक्ष-प्रभारी यांची एकही सभा नाही : उमेदवारांमध्येही खदखद
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीत बसपाच्या ७० ते ८० जागा निवडून आणण्याचा दावा प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रदेश प्रभारी उपासक यांनी केला होता. बसपाशिवाय महापौर होणार नाही, असा दावाही केला जात होता. परंतु प्रचाराच्या शेवटचा दिवस आला तरी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रभारी उपासक यानी उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही जाहीर सभा घेतली नाही. गरुड-उपासक यांनी प्रचाराकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याने असंतुष्ट कार्यकर्त्यांसोबतच उमेदवारांमध्ये सुद्धा खदखद वाढली आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून विदर्भात तळ ठोकून होते. दर आठवड्याला आढावा बैठका घेतल्या जात होत्या. परंतु खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली. सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, अशोक चव्हाण, प्रकाश आंबेडकर, प्रफुल्ल पटेल, खा. असदुद्दीन ओवेसी आदी नेत्यांच्या आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाल्या. परंतु बसपाचे प्रदेशाध्यक्ष व प्रभारी यांनी मात्र प्रचाराकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
प्रचाराचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे. परंतु या दोघांची एकही सभा आतापर्यंत झालेली नाही. (प्रतिनिधी)



लढाईच्या वेळी कुठे गेले नेते
निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष व प्रभारी नागपुरात वारंवार येऊन मोठमोठी भाषणे देऊन जायचे. परंतु आता खरी लढाई (निवडणूक) सुरू असताना हे नेते कुठे गेले, असा प्रश्न बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धम राऊत यांनी उपस्थित केला आहे. नागपुरात प्रदेश सचिव, मंडळ समन्वयक, जिल्हाध्यक्ष आणि मोठमोठे पदाधिकारी आहेत. परंतु त्यापैकी कुणी आपल्या पत्नीच्या, कुणी मुलाच्या तर कुणी भावाच्या प्रचारातच व्यस्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: How to kill BSP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.